'पोटाला चिमटा घेणाऱ्यांना जनता माफ करणार नाही', संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका

sambhaji patil nilangekar
sambhaji patil nilangekar

लातूर: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाऊन लावल्यासारखीच परिस्थिती आहे. यामुळे अनेकांच्या पोटाला चिमटा बसणार आहे. जिल्ह्यातही या लॉकडाऊनला विरोध होत आहे. कोणत्याही समाज घटकांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा न करता पालकमंत्र्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना शासनाच्या आदेशाबाबत लॉकडाऊनचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश तत्काळ मागे न घेतल्यास जनतेचा उद्रेक होईल. पोटाला चिमटा घेणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, अशी टीका माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

जिल्ह्यात अघोषित लॉकडाऊन करण्यात आला आहे. याबाबत अनेकांकडून विरोध होऊ लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर श्री. निलंगेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. शासनाने कडक निर्बंध आणून विकेंड लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याने विरोधी पक्ष या नात्याने आम्ही या निर्णयाचे समर्थन केले होते. पण, कडक निर्बंधाच्या नावाखाली शासनाने सर्व व्यापार बंद करून लॉकडाऊनच घोषित केला आहे, असे ते म्हणाले.

लातूरच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेवर मोठा अन्याय केला आहे. हा लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, कामगार तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्यासह लोकप्रतिनिधी व समाजातील विविध घटकांसोबत चर्चा करणे आवश्यक होते. ही चर्चा करण्याची तसदी न घेता जनतेला गृहीत धरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले केवळ व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेवून प्रश्न सुटणार नाही, असे श्री. निलंगेकर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com