लातूर : धर्मांतर करून परदेशात जाणाऱ्या तरुणाला अटक

latur
latur

लातूर : बनावट कागदपत्रे तयार करुन हिंदू तरुणाचा मुस्लिम धर्म स्वीकारुन परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 30 वर्षीय तरुणाला लातुरच्या दहशतवाद विरोधी पथकाने उदगीर येथून अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंग भुयकर हा बीदर जिल्ह्यातील जहिराबाद येथील मूळ रहिवाशी आहे. उदगीर येथे कामानिमित्त तो आला होता. एका बेकरित काम करताना त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि एका मुस्लिम तरुणीशी लग्न केले.

मोहम्मद रहमान इबने आदम असे स्वतःचे नाव ठेवून त्याने बनावट कागदपत्रे तयार केली आणि पासपोर्ट तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दहशतवाद विरोधी पथकाने संशय आल्याने त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com