लातूर- वादळी वाऱ्याने आंब्याचे कोट्यवधीं नुकसान

प्रशांत शेटे 
सोमवार, 9 एप्रिल 2018

चाकुर(लातूर) - तालूक्यात रविवारी (ता.८) रात्री झालेल्या वादळी वाऱ्यांचा आणि हलक्या पावसाचा फटका केशर आंब्याला बसला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील आंब्याचे नुकसान झाले असून, यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

तालूक्यात दोन दिवसापासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांनी थैमान घातले आहे. घरावरील पत्रे उडून जाणे तसेच झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. वादळाचा सर्वाधीक फटका केशर आंब्याला बसला आहे. तालूक्यात अनेक शेतकऱ्यांनी केशर आंब्याची लागवड केलेली असून, या हंगामात झाडाला आंबेच कमी लागले आहेत. त्यात वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयाचे नुकसान झाले असून, याचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

दरम्यान तालूक्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या आंब्याचा अहवाल कृषी विभागाकडून मागविण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार भरत सुर्यवंशी यांनी दिली.   

Web Title: Latur - Mango damage by stormy wind