विमान, हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली - मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

लातूर - निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर एकूणच महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमान व हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसंदर्भात लवकरच नियमावली तयार केली जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर सामान्य प्रशासनाच्या वतीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. नेमक्‍या काय चुका झाल्या, याचाही शोध घेतला जात आहे. केंद्र सरकारकडूनही याची चौकशी सुरू आहे. विमान व हेलिकॉप्टरने प्रवास करीत असताना सुरक्षिततेच्या संदर्भात नवीन नियमावली तयार केली जाणार आहे.'' "जीएसटी' लागू झाल्यानंतर भाव वाढतील, अशी अफवा पसरवली जात आहे. उलट वस्तूंच्या किमती कमी होतील. महागाई वाढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात अनेक ठिकाणी बिबट्या आढळून आला आहे. त्यात लातूर जिल्हादेखील आहे. त्यामुळे अशा भागातील शेतकरी, तसेच संबंधितांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केली जाणार आहे, असे ते म्हणाले.

'मुदतपूर्व'ची चर्चा नको
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुदतपूर्व निवडणुकीला तयार राहा, असे वक्तव्य केले होते. यावर ""ज्या वेळेस "मुदतपूर्व' लागेल त्या वेळेस तुम्हाला सांगितले जाईल. "मुदतपूर्व'ची चर्चा मध्यावधीतच नको, असे मुनगंटीवार म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.

Web Title: latur marathwada news aeroplane helicopter security rule