लातूरमध्ये कन्यारत्नाचे नाव 'स्वच्छता'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

लातूर - नगरसेवकाने आपल्या प्रभागात स्वच्छतेबाबत राबविलेल्या विविध उपक्रमांनी प्रभावित झालेल्या दांपत्याने आपल्या कन्यारत्नाचे नामकरण चक्क "स्वच्छता' असे केले. महापालिकेनेही "स्वच्छता' नावाचा जन्मदाखलाही दिला. एखाद्या मुलीचे नाव "स्वच्छता' ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबविले आहेत. कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढीसाठी बक्षिसे दिली. स्वखर्चातून मराठवाड्यातील पहिला यशस्वी खत निर्मिती प्रकल्प उभारला. टाकावू प्लॅस्टिकपासून डांबरी रस्त्याचाही यशस्वी प्रयोग त्यांनी केला. स्वच्छतेबाबतच्या उपक्रमाने याच प्रभागातील मोची गल्लीतील मोहन व काजल कुरील हे दांपत्य प्रभावीत झाले. 21 फेब्रुवारीला त्यांना कन्यारत्न झाले. तिचे नाव "स्वच्छता' ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महापालिकेच्या जन्म- मृत्यू विभागात तशी नोंद केली. शुक्रवारी थाटामाटात झालेल्या नामकरण सोहळ्यात त्यावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: latur marathwada news born baby girl swatchata name