लातूर जिल्ह्यात पावसाने जानवळचा पूल गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

लातूर - जिल्ह्यात बुधवारी (ता. सात) रात्री दहाही तालुक्‍यांत पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात बारा महसूल मंडळांत 60 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चाकूर तालुक्‍यातील झरी महसूल मंडळात तर रात्रीतून शंभर मिलिमीटर पाऊस झाला आहे. चाकूर तालुक्‍यात झालेल्या दमदार पावसामुळे जानवळ येथे लातूर-अहमदपूर मार्गावरील पूल वाहून गेला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. सात) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत 37.63 मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात 53.51 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Web Title: latur marathwada news bridge the gone by rain