बांधकाम कामगारांना घरकुलासाठी दोन लाख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

लातूर - राज्याच्या कामगार विभागाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नोंदणी होताच पाच हजार रुपये दिले जात आहेत. तसेच नोंदणीनंतर घरकुलासाठी खात्यावर दोन लाख रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती कामगार कल्याणमंत्री व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

लातूर महापालिकेतर्फे रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कार्यादेश व धनादेश वाटप कार्यक्रमात ते गुरुवारी (ता. 29) बोलत होते. रमाई आवास योजनेत लाभार्थ्यांना अडीच लाख दिले जात आहेत; पण लाभार्थी बांधकाम कामगार असून त्याने नोंदणी केली असेल तर त्याच्या खात्यावर कामगार विभागाकडून दोन लाख रुपये दिले जाणार आहेत. साडेचार लाखांत घर बांधता येणार आहे. महापालिकेने एप्रिलमध्ये बांधकाम कामगार नोंदणी सप्ताह घ्यावा व या योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन निलंगेकर यांनी केले.

Web Title: latur marathwada news construction worker gharkul money