लातुरात ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

लातूर - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे 54 वे राज्यस्तरीय अधिवेशन 15 व 16 ऑक्‍टोबर रोजी लातूरला होणार आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. लातुरात प्रथमच होत असलेले हे राज्यस्तरीय अधिवेशन लातूरच्या परंपरेला साजेसे असे घेण्याचा मानस नुकत्याच येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोक कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक येथे झाली. या बैठकीत अधिवेशनाची संपूर्ण रूपरेषा ठरविण्यात आली.

Web Title: latur marathwada news library team session