लातुरात लिंगायत समाजाचा महामोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

लातूर - अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे रविवारी शहरात लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी महामोर्चा काढण्यात आला. त्याचे ड्रोनच्या साह्याने छायाचित्रकार श्‍याम भट्टड यांनी टिपलेले छायाचित्र.

लातूर - अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे रविवारी शहरात लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी महामोर्चा काढण्यात आला. त्याचे ड्रोनच्या साह्याने छायाचित्रकार श्‍याम भट्टड यांनी टिपलेले छायाचित्र.
लातूर - लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या व अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे रविवारी (ता. तीन) येथे महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चानेही इतिहास घडविला. यात महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांतून लाखो समाजबांधव सहभागी झाले होते.

जिल्हा क्रीडा संकुलातून मोर्चाला सुरवात झाली. सकाळपासूनच जत्थेच्या जत्थे संकुलाकडे येत होते. "लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म' या जयघोषाने सिद्धेश्वरनगरी दुमदुमून गेली होती. या महामोर्चाचे नेतृत्व 102 वर्षांचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी केले. या वयातही त्यांनी कणखरपणे भाषण करीत "जागा, लिंगायत म्हणून सांगा' असा संदेश या वेळी दिला. हा महामोर्चा शांततेत पार पडावा यासाठी समितीतर्फे दोन हजार स्वयंसेवक कार्यरत होते.

Web Title: latur marathwada news lingayat society rally in latur