हिंगोलीच्या व्यवस्थापकास पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

लातूर - वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्‍या जमाती विकास महामंडळाच्या येथील कार्यालयात झालेल्या तीन कोटी 68 लाखांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक व सध्या हिंगोली येथे जिल्हा व्यवस्थपकपदी कार्यरत असलेले प्रेमसिंग गोरोबा राठोड (रा. पळशी, ता. किनवट) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. हाके यांनी दिली. लाभार्थ्यांना बेकायदीशीरपणे कर्जवाटप, त्या संबंधीचे सर्व रेकॉर्ड गायब करून तीन कोटी 68 लाख 87 हजार 119 रुपयांचा अपहार केल्याचे हे प्रकरण आहे. महामंडळाचे तत्कालीन तीन जिल्हा व्यवस्थापकांसह एका मानधन तत्त्वावरील लिपिकाच्या विरोधात येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक शैलजा प्रल्हाद काळे यांच्या फिर्यादीवरून दोन नोव्हेंबरला गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: latur marathwada news police custody