थकबाकीचा डोंगर घेऊन शहराला पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

लातूर - लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या विविध ठिकाणी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची विजेची मूळ थकबाकी १९ कोटी ३९ लाख असून त्यावर आता महावितरणचे १८ कोटी ८८ लाख व्याज झाले आहे. अशी एकूण ३८ कोटी २७ लाख रुपये विजेची थकबाकी झाली आहे. हा थकबाकीचा डोंगर घेऊन महापालिका सध्या शहराला पाणीपुरवठा करीत आहे. ही थकीत वीज देयके शासनाने माफ करावीत याकरिता महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

लातूर शहर पाणीपुरवठा योजना धनेगाव, हरंगूळ, वरवंटी, आर्वी जलशुद्धीकरण केंद्र, नागझरी, साई येथे महावितरणची उच्च दाब जोडणी आहे. तसेच दक्षिण उपविभागाच्या बोअरवेलसाठी व उत्तर उपविभागाच्या बोअरवेलसाठी कमी दाबाची जोडणी आहे. याचे लाखो रुपये महिन्याला वीज बिल येत आहे. यात गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेने हे बिलच भरले नसल्याने त्याची दिवसेंदिवस थकबाकी वाढत चालली आहे. या सर्व योजनांची मूळ थकबाकी १९ कोटी ३९ लाख २७ हजार ९१० रुपये आहे. तर महावितरणने त्याच्यावर आतापर्यंत १८ कोटी ८८ लाख १५ हजार ७०१ रुपये व्याज लावले आहे. याची एकूण रक्कम आता ३८ कोटी २७ लाख ४३ हजार ६११ रुपयांच्या घरात गेली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ही बिलेच भरली जात नाहीत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महावितरणने कनेक्‍शनही तोडले होते. पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी आता महापालिकेने महावितरणकडून हप्ते पाडून घेतले आहेत. यात मुख्य पाणीपुरवठा योजना ही धनेगाव येथील मांजरा धरणावर आहे. त्याची सध्या चार कोटी २० लाख २१ हजार ४११ रुपये मूळ थकबाकी आहे. याचे ५० हप्ते पाडून दरमहा आठ लाख ४० हजार ४२८ रुपये भरले जात आहेत. उर्वरित उच्च दाब जोडणीचेही असेच ५० हप्ते करण्यात आले आहेत. 

वीज बिल देयकाची व्याजासह रक्कम ३८ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आता राज्य शासनाकडून ही थकबाकी माफ करता येते का, यासाठीच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे पाणीपट्टी व कराच्या वसुलीवरही भर दिला जात आहे.

Web Title: latur marathwada news water supply arrears latur municipal