महापालिकेच्या उपक्रमांसाठी जागांचा शोध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

लातूर - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध उपक्रमांसाठी जागा शोधून योजना कार्यान्वित करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. शादीखाना व ईदगाह मैदानासाठी जागा खरेदी करण्यासह शहरात एलईडी पथदिवे बसविणे व माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव घेण्यात आला. 

लातूर - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध उपक्रमांसाठी जागा शोधून योजना कार्यान्वित करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. शादीखाना व ईदगाह मैदानासाठी जागा खरेदी करण्यासह शहरात एलईडी पथदिवे बसविणे व माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव घेण्यात आला. 

महापौर दीपक सूळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 30) सर्वसाधारण सभा झाली. उपमहापौर चांदपाशा घावटी व आयुक्त रमेश पवार उपस्थित होते. दलित वस्ती योजनेत नामंजूर झालेल्या कामांऐवजी नगरसेवकांनी सुचविलेल्या नवीन कामांचे फेरप्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाला. शहरातील माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्यासाठी शासनाचे परिपत्रकानुसार, तसेच आगाऊ घरपट्टी भरणारांना सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली. लातूर श्रमिक पत्रकार संघाच्या मीडिया सेंटरसाठी, तसेच अन्य 

पत्रकार संघटनांच्या विनंतीनुसार जागा देण्यास मान्यता देण्यात आली. पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात शहरी बेघरांसाठी निवारा बांधण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी भालचंद्र ब्लड बॅंकेजवळील किंवा उपलब्ध जागा देण्याचे ठरले. शहरातील प्रभाग पाणंदमुक्त जाहीर करण्यास सदस्यांनी विरोध केल्याने स्वच्छ भारत अभियानातील कामांची गती वाढविण्याचे ठरले. शादीखाना व इदगाह मैदानासाठी अतिरिक्त जागा खरेदी करणे, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी 
होळकर सभागृह व नवबौद्ध बांधवांसाठी विपश्‍यना केंद्र बांधण्यासाठी जागा खरेदीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली. 

विरोधी पक्षनेते मकरंद सावे, सभागृहनेते रविशंकर जाधव, नगरसेवक सुरेश पवार, लक्ष्मण कांबळे, शैलेश स्वामी, राजेंद्र इंद्राळे, असगर पटेल, चंद्रकांत चिकटे, रवी सुडे, राहुल माकणीकर, गिरीश पाटील, नगरसेविका केशरबाई महापुरे, इरशाद तांबोळी, सुनीता चाळक, वनिता काळे यांच्यासह इतर सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. 

Web Title: latur municipal corporatino