उमेदवारांची आज मुख्य परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

लातूर - महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीसाठी शहरातील 371 मतदान केंद्रांवर बुधवारी (ता. 19) सकाळी 7.30 पासून सायंकाळी 6.30 पर्यंत मतदान होणार आहे. महापालिका प्रशासन व निवडणूक विभागाने मतदानाची  जय्यत तयारी केली आहे. राजकीय पक्ष व अपक्षांसह 401 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. 

लातूर - महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीसाठी शहरातील 371 मतदान केंद्रांवर बुधवारी (ता. 19) सकाळी 7.30 पासून सायंकाळी 6.30 पर्यंत मतदान होणार आहे. महापालिका प्रशासन व निवडणूक विभागाने मतदानाची  जय्यत तयारी केली आहे. राजकीय पक्ष व अपक्षांसह 401 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. 

महापालिकेच्या 18 प्रभागांतून अ, ब, क अणि ड गटातून एकूण 70 सदस्यांच्या निवडीसाठी हे मतदान होत आहे. त्यासाठी 401 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांत लढत होत आहे. पालिकेच्या हद्दीतील 371 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी 89 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 21, शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीतील 24, विवेकानंद चौक ठाण्याच्या हद्दीतील 26, एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील 18 मतदान केंद्रांचा समावेश आहे. महापालिकेच्या निवडणुकीतील मतदारांची एकूण संख्या दोन लाख 77 हजार 774 आहे. 

प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व एक पोलिस कर्मचारी नेमले आहेत. 371 मतदान केंद्रांवर एक हजार 855 तसेच राखीव कर्मचाऱ्यांसह अडीच हजार कर्मचारी नियुक्त झाले आहेत. ता. 21 एप्रिल रोजी सकाळी दहापासून महिला तंत्रनिकेतन येथे मतमोजणी होईल. यंदाच्या निवडणुकीत मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीसाठी केंद्रासमोर मंडप उभारण्याचे नियोजन आहे. वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्थेसाठी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे. 

सरासरी 350 ते 800 मतदार 
पालिकेच्या क्षेत्रात दोन लाख 78 हजार 374 मतदार आहेत. त्यात एक लाख 46 हजार 561 पुरुष तर, एक लाख 31 हजार 813 महिला मतदार आहेत. साधारणतः 350 ते 800 मतदारांसाठी एकप्रमाणे 371 केंद्रांत मतदान होईल. शहरातील बहुतांश 
प्रभागांत सरासरी 15 ते 16 हजार मतदार असून, प्रभाग नऊमध्ये 20 हजार 570 सर्वाधिक तर, प्रभाग 18 मध्ये सर्वांत कमी नऊ हजार 457 मतदार आहेत. 

Web Title: latur municipal corporation election