हे सरकार महाराष्ट्राला परवडणारे नाही: अजीत पवार

जलील पठाण
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

औशात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला लोटला जनसमुदाय

औशात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला लोटला जनसमुदाय

औसा (जि. लातूर): दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन सत्तेची पोळी भाजनारे हे सरकार खोटे बोलनारे व दिशाभुल करुन राजकारण करणारे असल्याने शाहु, अंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. अशा सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचा हा हल्लाबोल आहे. निवडणुकीत जर योग्य बटन दाबले गेले असते तर परिस्थिती खूप वेगळी दिसली असती. सरकार सर्वच बाजूंनी अपयशी ठरले असून, त्यांनी निवडणुक काळात दिलेल्या एकाही अश्वासनाची पुर्तता केल्याचे आठवते का?" असा भाजपा-सेना सरकारचा खरपूस समाचार माजी मुख्यमंत्री अजीत पवार यांनी आज (शुक्रवार) औसा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल अंदोलना नंतर झालेल्या जाहीर सभेत घेतला.

पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असून भर पिकांना पाणी देण्याच्या वेळेत त्यांची विज कापली जात आहे. या सरकारच्या धोरणाचा फटका हा सर्वच क्षेत्रात बसत असून असे कुठलेही क्षेत्र नाही की ते चांगली वाटचाल करीत आहे. गरीबांच्या मानगुटीवर बसून बड्या कर्जबुडव्यांना सरकार सोडत असल्याचा आरोपही श्री. पवार यांनी यावेळी केला. सेना आणि भाजपा हे एका माळेचे दोन मनी असून यांनी खोटे नाटे आरोप करुन लोकांच्या भावनांना हात घालत सत्ता तर हस्तगत केली. परंतु, सरकार चालवितांना मात्र ते अपयशी ठरले आहेत. कोरेगाव भीमा येथील घटनेत जातीयवादी मनू वृत्तीला हे सरकार खतपाणी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व प्रवक्ते नवाब मलीक यांनी सेना भाजपाच्या सरकारवर टिकास्त्र सोडत या सरकारला उलथून टाकण्यासाठी व रयतेचे राज्य आणन्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगीतले. यावेळी व्यासपिठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणा जगजीतसिंह, आ. विक्रम काळे, आ. सतिश चव्हाण, चित्रा वाघ. आ. विद्या चव्हाण आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. जाहीर सभेनंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.

Web Title: latur news aausa ncp ajit pawar political attack on maharashtra government