लातुरात महिन्याला दीड हजार बोअर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

लातूर - जिल्ह्याची पाणीपातळी खाली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर परराज्यांतील बोअरवाल्यांकडून धुमाकूळ घातला जात आहे. दररोज ४० मशीन भूजल अधिनियम धाब्यावर बसवून ५० बोअर घेत आहेत. महिन्याला दीड हजार बोअर घेऊन जमिनीची चाळणी केली जात आहे. यातून महिन्याला सात ते आठ कोटी रुपये एकट्या लातूर जिल्ह्यातून परराज्यांत जात आहेत.

भूजल अधिनियमानुसार मशीनची नोंदणी करणे बंधनकारक आहे. पण जिल्ह्यात एकाही बोअर मशीनची नोंदणीच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. याकडे प्रशासनाने आता लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात दोन वर्षानंतर आता पाणीपातळी खाली जात आहे. त्यामुळे अनेक बोअर कोरडे पडत आहेत. हे लक्षात घेऊन ४० बोअर मशीनचा धुमाकूळ सुरू आहे. यात रेणापूर तालुक्‍यात सात, लातूर तालुक्‍यात तीन, औसा तालुक्‍यात पाच, निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात सात, उदगीर, जळकोट, देवणी तालुक्‍यात दहा, अहमदपूर, चाकूर तालुक्‍यात आठ मशीनद्वारे बोअर पाडणे सुरू आहे.

कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये बंदी
कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतील अनेक भागांत बोअर घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तेथील तसेच तामिळनाडू येथील या बोअरच्या मशीन येथे आल्या आहेत. सध्या या मशीनवर कोणाचेच नियंत्रण नाही.

आठ कोटी  चालले परराज्यांत
जिल्ह्यात या मशीन रात्रंदिवस बोअर घेत आहेत. दिवसाला सरासरी ५० म्हणजेच महिन्याला दीड हजार बोअर घेतले जात आहेत. सरासरी एका बोअरला पन्नास हजार रुपये खर्च आहे. यातून सात ते आठ कोटी रुपये महिन्याला जिल्ह्यातून परराज्यांत चालले आहेत. 

अधिनियम धाब्यावर बसवून जमिनीची चाळणी
या सर्व मशीन हायप्रेशरच्या आहेत. तासाला १२५ फूट खोल खोदण्याची क्षमता या मशीनची आहे. एका ठिकाणी पाच-पाच तास या मशीन चालत आहेत. भूजल अधिनियम धाब्यावर बसवून या मशीन जिल्ह्यातील जमिनीची चाळणी करीत आहेत. चारशे ते पाचशे फुटांच्या खाली बोअर घेतले जात आहेत. यावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे या मशीनवाल्यांचे फावत आहे.

Web Title: latur news borewell water