लातूरला लाच प्रकरणातील उपअधीक्षक पोलिसांना शरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

लातूर - येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एका मोटार वाहन निरीक्षकाला पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईच्या पथकाने शनिवारी (ता. १२) विभागाचा (एससीबी) येथील पोलिस उपअधीक्षक सुरेश शेटकर याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी (ता. १५) शेटकर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांसमोर शरण आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

आरटीओ कार्यालयातील एका मोटार वाहन निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला श्री. शेटकर याने काही दिवसांपूर्वी मोबाईलद्वारे संपर्क साधून ‘तुमच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार’ असल्याचे सांगितले. तक्रारीची चौकशी न करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात मध्यस्थ असलेला दत्ताकृपा ड्रायव्हिंग स्कूलचा चालक छोटू गडकरी याला पोलिसांनी ५० हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेसह अटक केली होती. शेटकर मात्र मिळाला नव्हता. मंगळवारी शेटकर पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले. वाहन निरीक्षकांच्या विरोधात नेमका काय अर्ज आला आहे तो अर्जच मिळत नसल्याने पोलिसांनी शेटकर याची दोन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती; पण न्यायालयाने एक दिवसाची कोठडी दिली. त्यानंतर बुधवारी पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. या वेळी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देऊन जामीन मंजूर केला आहे. 

Web Title: latur news bribe

टॅग्स