फैज महंमदच्या पोलिस कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

लातूर - येथे उघडकीस आलेल्या बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातील हैदराबादचा संशयित आरोपी फैज महंमद याला शुक्रवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले. त्याला 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 450 पेक्षा जास्त सिमकार्ड जप्त केली आहेत. यातील बहुतांश सिमकार्ड ही रिलायन्स व बीएसएनएल या कंपनीचे आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे ती घेतली जात असल्याचे समोर येत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या ठिकाणांहून सिमकार्ड आणली आहेत. आणखी कोणत्या ठिकाणाहून ती आणली गेली, याचा शोध पोलिस घेत आहेत. लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या सूचनेवरून दहशतवाद विरोधी पथक तसेच स्थानिक पोलिसांनी सहा दिवसांपूर्वी येथील बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघडकीस आणले होते. त्यानंतरच्या तपासात आतापर्यंत शहरात चार बनावट एक्‍स्चेंज आढळली. यात प्रमुख संशयित असलेल्या हैदराबादच्या फैज महंमद यालाही पोलिसांनी अटक केली. त्याची पोलिस कोठडीची मुदत आज संपली. पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याच्याकडून आणखी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

Web Title: latur news duplicate Telephone Exchange Case