बनावट एक्‍स्चेंजचा तपास पोलिस उपअधीक्षकांकडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

लातूर - गेल्या काही दिवसांपासून येथे चर्चेत असलेल्या बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणाचा तपास आता पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणात सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे चीन कनेक्‍शन असल्याचा संशय आहे. त्याचा शोधही आता वेगवेगळी पथके घेऊ लागली आहेत. यातूनच हा तपास आता उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. 

लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या सूचनेवरून पंधरा दिवसांपूर्वी राज्य दहशतवादविरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथे बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघड केले होते. त्यानंतर एकूण चार एक्‍स्चेंज येथे उघडकीस आली. याचे हैदराबाद कनेक्‍शनही पोलिसांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणात आतापर्यंत सात संशयितांना अटकही करण्यात आली होती. त्यांच्याकडून अंदाजे पाचशे सीमकार्डेही जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे कार्यालय हे पुण्यात आहे. त्याकडेही पोलिसांनी लक्ष देणे सुरू केले आहे. या कंपनीचे चीन कनेक्‍शन असल्याचा संशयही पोलिसांना असून, त्याचाही तपास केला जात आहे. संशयित आरोपींच्या बॅंक खात्याचीही तपासणी केली जात आहे. काही जणांच्या खात्यावर राजस्थानमधून कसा पैसा आला, हेही पाहिले जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्याकडे देण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक व दहशतवादविरोधी कक्षाचे एक पथक काम पाहणार आहे.

Web Title: latur news duplicate Telephone Exchange case

टॅग्स