बनावट टेलिफोन एक्‍स्चेंजचा पाच यंत्रणांकडून तपास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

लातूर - गेल्या काही दिवसांत शहरात चार बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघडकीस आली आहेत. याचे मोठे जाळे पसरलेले आहे. दहशतवादाशी संबंध आहे का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरीदेखील या प्रकरणाचा तपास एटीएस, आयबी, सीआयडी, दहशतवादविरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा अशा पाच यंत्रणांकडून सुरू आहे. दरम्यान, संशयित आरोपींनी वापरलेल्या मशिनमध्ये कॉल नोंद न होणारे कोणते सॉफ्टवेअर वापरले याचा अद्याप शोध लागलेला नाही. 

लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या सूचनेवरून दहशतवादविरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने येथे छापा टाकला होता. पहिल्या दिवशी दोन बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघडकीस आणली होती. यावेळी एटीएसने शासनाच्या टेलिकम्युनिकेशन विभागाच्या निदेशकांनाच सोबत आणले होते. यात दोन एक्‍स्चेंजमधून सहा महिन्यांत 15 कोटींची शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी वलांडी येथे छापा टाकून तसेच शहरात आणखी दोन बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघडकीस आणले होते. यातूनही मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक झाली असण्याची शक्‍यता आहे. या एक्‍स्चेंजमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय कॉलची कोठेच नोंद होत नसल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दहशतवाद्यांशी काही संबंध आला आहे का? याचाही तपास घेतला जात आहे. सध्या या प्रकरणात एटीएस, आयबी, सीआयडी, दहशतवादविरोधी पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अशा पाच यंत्रणा तपास करीत आहेत. पण या एक्‍स्चेंजमध्ये वापरल्या गेलेल्या मशिनमध्ये कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर केला याचा स्थानिक पोलिसांना तपास लागलेला नाही.

Web Title: latur news Fake telephone exchanges marathwada news