ग्रामपंचायत निवडणूकीत लोकशाहीचा त्रागा हो..!

विकास गाढवे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

लातूर : जिल्ह्यातील 333 ग्रामपंचायत निवडणूकीत आज (शनिवार) झालेल्या मतदानात मतदारांची मतदान केंद्र शोधताना दमछाक झाली. या निवडणूकीत राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदान चिठ्ठी (पोलचीट) न दिल्याने मतदारांना स्वतःच केंद्राचा शोध घेऊन मतदान करण्यासाठी धावपळ करावी लागली. निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर अॅप्लीकेशनवरही केंद्राची माहिती नव्हती. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार राजाचा चांगलाच त्रागा झाला.

आयोगाकडून प्रत्येक निवडणूकीत `मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो` या घोषणेतून मतदारानासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यात येते. शनिवारी ही जागृती फुसका बार ठरली. मतदान करून घेताना उमेदवारांची धावपळ उडाली. थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्याच्या नव्या धोरणानुसार शनिवारी जिल्ह्यातील 333 ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. मतदानापूर्वी काही दिवस आधी पूर्वी उमेदवारांकडून पोलचिट देण्यात येत होती. यामुळे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती मिळत होती. ही पद्धत बंद करून काही वर्षापासून आयोगाकडूनच पोलचीटचे बीएलओमार्फत वाटप करण्यात येत आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीतही आयोगाकडूनच पोलचीटचे वाटप होईल, या आशेने उमेदवारांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. त्याचा मोठा परिणाम शनिवारी सर्वांनाच सहन करावा लागला. आयोगाकडून जिल्हाभरात एकही पोलचिट वाटप करण्यात आली नाही. यामुळे ऐनवेळी उमेदवारांसह मतदारांचीही धावपळ झाली. मतदार यादीत नाव शोधण्यासोबत केंद्र गाठून मतदान करताना मतदारांची धांदल उडाली. मुरूड (ता. लातूर) येथे काही उमेदवारांनी लॅपटॉपच्या साह्याने तातडीने मतदारांना केंद्र शोधण्यासाठी मदत केली. एका प्रभागात तीन ते चार केंद्र असल्याने मतदारांना सर्व केंद्रावर चकरा माराव्या लागल्या.

निवडणुक आयुक्तही अनिभिज्ञ
पोलचिट वाटप न झाल्याप्रकरणी राज्य निवडणुक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया अनभिज्ञ होते. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी पोलचिटचे वाटप केल्याचे ठासून सांगितले. तर तहसीलदार संजय वारकड यांनी आयोगाकडून पोलचिट आल्याच नसल्याचे स्पष्ट केले. आयोगाच्या कार्यालयातील सुत्रांनी मतदार यादी तयार केल्यानंतर आपोआप पोलचिट तयार होत असल्याचे नमूद केले. त्यापुढे जाऊन मुरूडचे मंडळ अधिकारी बी. व्ही. बेरूळे यांनी पोलचिट बीएलओंकडे वाटप करण्यासाठी दिल्याचे सांगून त्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका असल्याने व त्या संपावर असल्याने त्यांच्याकडून पोलचिटचे वाटप झाले नसल्याचे हास्यास्पद दावा केला.

Web Title: latur news Gram panchayat elections will be a leader of democracy