अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभारही अतिरिक्तच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

लातूर - लातूर महापालिका स्थापन होऊन सहा वर्षे होत आली आहेत, पण याचा आकृतिबंद अद्याप मंजूर झालेला नाही. तर, दुसरीकडे या महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. याचा परिणाम अधिकारी येत नाहीत. सध्या महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभारही एका अधिकाऱ्याकडे अतिरिक्तच आहे. इतर प्रमुख पदांचे पदभारही काही अधिकाऱ्यांच्याच खांद्यावर आहेत. याचा परिणाम कामकाजावर होताना दिसत आहे. 

महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पहिल्यांदा शिवाजी शिंदे रुजू झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली. त्यानंतर या पदावर एकही अधिकारी आला नाही. ते पद रिक्तच राहिले. अनेक आयुक्त येऊन गेले; पण त्यांनी या पदाचा पदभारही कोणाला दिला नाही. पण, काही दिवसांपूर्वी रुजू झालेले आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी मात्र रिक्त असलेल्या पदाचा पदभार देण्यास सुरवात केली आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी असलेले सतीश शिवणे यांच्याकडे उपायुक्त (सा.) या पदाचा पदभार आहे. आता त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. औसा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे महापालिकेच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आहे. सहायक आयुक्त असलेले त्र्यंबक कांबळे यांच्याकडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आहे. शहर अभियंता असलेले दिलीप चिद्रे यांच्याकडे अतिरिक्त सहायक संचालक नगररचना या पदाचा अतिरिक्त पदभार आहे. महापालिकेतील वेगवेगळ्या विभाग प्रमुखांकडे दोन ते तीन विभागांचा अतिरिक्त पदभार आहे. याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होताना दिसत आहे. 

Web Title: latur news latur mahanagar palika