लातूरः रेल्वे कृती समितीतर्फे शैक्षणिक बंद आवाहनला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

लातूर : लातूर - मुंबई एक्‍स्प्रेस रेल्वेचे बिदरपर्यंत झालेला विस्तार रद्द करण्यासाठी रेल्वे बचाव कृती समिती व युवक आघाडीच्या वतीने आज (बुधवार) शैक्षणिक बंदचे आवाहन केले असून, या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासूनच समितीचे कार्यकर्ते  शाळा, महाविद्यालयात जावून बंदचे आवाहन करीत होते. बंदचे आवाहन करणाऱया 11 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले.

मागील दहा वर्षांपासून लातूरकरांच्या सेवेत असलेली लातूर - मुंबई एक्‍स्प्रेस रेल्वेचा विस्तार बिदरपर्यंत झाला आहे. लातूर ही देशातील अग्रगण्य बाजारपेठ असून शिक्षणाचे माहेरघर आहे. लातूरच्या जनतेला विश्वासात न घेता रेल्वेचा बिदरपर्यंत विस्तार झाल्याने विद्यार्थी, व्यापारी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे विस्तारीकरण रद्द करून बिदर - कुर्ला ही दैनंदिन रेल्वे सुरू करावी, हैद्राबाद - पुणे रेल्वे मुंबईपर्यंत वाढवावी आदी मागण्यांसाठी समितीच्या वतीने या शैक्षणिक बंदचे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालय बंद ठेवून कृती समितीच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे ऍड. प्रदीपसिंह गंगणे, ऍड. गोपाळ बुरबुरे, बालाजी पिंपळे, ऍड. अजय कलशेट्टी, साईनाथ घोणे, श्रीकांत रांजणकर व पदाधिकाऱ्यांनी केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: latur news latur mumbai express railway and school