महापालिकेच्या कामकाजाला शिस्तच नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

लातूर - महापालिकेचे नूतन आयुक्त अच्युत हांगे यांनी येथे येताच कामाला सुरवात केली आहे. त्यांनी सोमवारी महापालिकेतील सर्व विभागांना भेटी दिल्या; पण या भेटीत प्रत्येक विभागातील कामकाजाबद्दल नाराजीच व्यक्त केली. महापालिकेला शिस्तच नाही अशी टिप्पणीही त्यांनी करीत अनेक कर्मचाऱ्यांची आपल्या स्टाइलने कानउघाडणी केली. श्री. हांगे महापालिकेला कशी शिस्त लावतात याकडे आता लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे होता; पण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर गेल्या आठवड्यात राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड येथे कार्यरत असलेले अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तातडीने येथे आयुक्तपदावर बदली केली होती. श्री. हांगे सोमवारी येथे रुजू झाले. सकाळी त्यांनी महापौर सुरेश पवार यांची भेट घेतली. श्री. पवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. हांगे यांनी महापालिकेच्या लेखा, जन्म-मृत्यू नोंद, विवाह नोंद, स्वच्छता, कर, मालमत्ता, जनसंपर्क, लाइट, एक खिडकी अशा सर्व विभागांना भेटी दिल्या. या भेटीत अनेक कार्यालयांत फाइल अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक कर्मचाऱ्यांना आपण काय काम करतो याचे व्यवस्थित उत्तरही देता आले नाही. कार्यालयातील स्वच्छतेचा अभावही श्री. हांगे यांना दिसून आला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांशी बोलताना महापालिकेला शिस्त राहिली नाही, अशी टिप्पणी करीत त्यांनी आपल्या स्टाइलने काही कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.

‘कामचुकारांना सोडणार नाही’
श्री. हांगे यांनी दुपारी महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. दोन तास ही बैठक झाली. कोण काय काम करतो, याची माहिती त्यांनी करून घेतली. १९८९ मध्ये परिविक्षाधिन मुख्याधिकारी म्हणून श्री. हांगे येथे सहा महिने होते. त्याची आठवण करून देत त्यावेळेसचे वैभव आता राहिले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकाला काम करावेच लागेल, कामचुकारांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

Web Title: latur news latur municipal

टॅग्स