लातूर विभागाचा दहावीचा निकाल ८५.२२ टक्के

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

निकालाच्या टक्केवारीत मुलीच अव्वल

लातूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा ८५.२२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल चार टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी देखील निकालाच्या टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे, अशी माहिती विभागीय मंडळाचे सचिव डॉ. गणपत मोरे यांनी दिली.

निकालाच्या टक्केवारीत मुलीच अव्वल

लातूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा ८५.२२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल चार टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी देखील निकालाच्या टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे, अशी माहिती विभागीय मंडळाचे सचिव डॉ. गणपत मोरे यांनी दिली.

लातूर विभागीय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी लातूर, नांदेड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातून एक लाख नऊ हजार २३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात ९३ हजार ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ८५.२२ इतकी आहे. गत वर्षी विभागाचा निकाल ८१.५४ टक्के होता. यावर्षी २१ हजार ५०२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात, ३१ हजार ८४० विद्यार्थी ग्रेड एक, १० हजार ७८१ विद्यार्थी ग्रेड दोन तर ९ हजार १६६ विद्यार्थी पास ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही निकालाच्या टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे. विभागात ४८ हजार ७७४ मुलींनी परीक्षा दिली होती. त्या पैकी ४३ हजार ३१८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याची टक्केवारी ८८.८१ इतकी आहे. तर ६० हजार ४५७ मुलांनी परीक्षा दिली होती. त्या पैकी ४९ हजार ७७४ मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ८२.३३ इतकी आहे, अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली.

लातूर विभागात शु्न्य टक्के निकाल लागलेल्या नऊ शाळा आहेत. ९० टक्के पेक्षा जास्त निकाल लागलेल्या ४८४ तर शंभर टक्के निकाल लागलेल्या १३३ शाळा आहेत. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर ३८ गैरप्रकार घडले होते. त्यात लातूर जिल्ह्यात तीन, नांदेड जिल्ह्यात १३ व उस्मानाबाद जिल्ह्यात २२ गैरप्रकाराच्या घटना घडल्या होत्या. तर परीक्षेनंतर ३६ गैरप्रकारच्या घटना उघ़डकीस आल्या होत्या. यात लातूर १३, उस्मानाबाद दहा, नांदेड जिल्ह्यात १३ घटनांचा समावेश होता. या सर्व प्रकारात ३८ विद्यार्थ्याना रस्टिकेट करण्यात आले आहे. सहा जणांची एक परीक्षेची संपादणूक पातळी रद्द करण्यात आली आहे. ४८ जणांची एक अधिक एक तर दोघांची एक अधिक पाच परीक्षा संपादणूक पातळी रद्द करण्यात आल्याची माहिती श्री. मोरे यांनी दिली.

Web Title: latur news latur ssc result