ऑनलाइन नोंदणी करूनही तूर खरेदी केंद्रांची प्रतीक्षा

Turdal
Turdal

लातूर - गेल्या काही महिन्यांपासून अडत बाजारातील तुरीचे भाव दिवसेंदिवस पडलेले आहेत. त्यामुळे शासनाच्या तूर खरेदी केंद्राकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे; पण जानेवारी संपला तरी खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यात गेल्यावर्षी शासनाने खरेदी केलेली सव्वातीन लाख क्विंटल तूर पाच गोदामांत पडून आहे. त्यामुळे ही खरेदी लवकर सुरू होते की नाही याकडे आता लक्ष लागले आहे.

शासनाने तुरीसाठी पाच हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. केंद्र शासनाने डाळीच्या बाबतीत निर्यात व आयातीच्या बाबतीत काही निर्णयही घेतले; पण बाजारातील भाव काही केल्या वाढताना दिसत नाहीत. 
आजही बाराशे ते तेराशे रुपये कमी दराने तुरीची खरेदी सुरू आहे. राज्य शासनाकडून गेल्या दीड महिन्यापासून शासन खरेदी केंद्र सुरू करणार असल्याच्या जाहिराती केल्या जात आहेत. याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहनही केले जात आहे. यात लातूर जिल्ह्यात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. सध्या बाजारात दररोज दहा ते पंधरा हजार क्विंटल तुरीची विक्री होत आहे. सरासरी भाव चार हजार पाचशे रुपये राहत आहे. शासनाचे खरेदी केंद्र सुरू होईल, या आशेने १६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. ही नोंदणी सुरूच आहे. अधिकाधिक नोंदणी व्हावी, याकरिता मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावांत जाऊन ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही नोंदणी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यात शासनाने गेल्यावर्षी तीन लाख ६५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली होती. यापैकी केवळ १५ हजार क्विंटल तूरच विक्री झाली आहे. सव्वातीन लाख क्विंटल तूर गोदामात पडून आहे. त्यामुळे शासनाच्या खरेदी केंद्राकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 
खरेदी  केलेल्या           नोंदणी
केंद्राचे नाव           शेतकऱ्यांची संख्या

अहमदपूर                १२५५
औसा                      ३१७४
चाकूर                     २३९०
देवणी                     १६५३
जळकोट                   ९४९
लातूर                       ३२०
निलंगा                   १३६२
रेणापूर                     ५०९
साकोळ                    ४८०
उदगीर                   ३८५१
एकूण                  १५,९४३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com