दोन हजार स्वयंसेवक अन्‌ हजार पोलिस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

लातूर - लाखोंच्या संख्येने या महामोर्चात लिंगायत समाजबांधव सहभागी होणार होते. हे माहीत असल्याने अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे तसे नियोजनही करण्यात आले होते. या समितीचे दोन हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्यांना ओळखपत्र आणि जागाही नेमून देण्यात आल्या होत्या. दुसरीकडे एक हजार पोलिस महामोर्चावर लक्ष ठेवून होते. दोघांच्या समन्वयामुळे हा मोर्चा शांततेत व शिस्तीत पार पडला. अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचनाही वारंवार देण्यात येत होत्या. एकाच वेळी गोंधळ होणार नाही याची काळजी ही घेण्यात येत होती; तसेच  शंभर खासगी सुरक्षा रक्षकही कार्यरत होते. 

पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड सकाळपासूनच स्वतः रस्त्यावर उतरले होते. मोर्चेकरी येण्यापूर्वीच त्यांनी आढावाही घेतला होता; तसेच संबंधितांना सूचना देऊन त्यांची ठिकठिकाणी रवानगी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सहा पोलिस उपअधीक्षक, २५ पोलिस निरीक्षक, ४५ पोलिस उपनिरीक्षक आठशे पोलिस, एक एसआरपीची कंपनी कार्यरत होती. इतकेच नव्हे, तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून या मोर्चावर नियंत्रण ठेवण्यात येत होते.

अनेक महिन्यांपासून तयारी
समितीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून या महामोर्चाची तयारी करण्यात येत होती. वारंवार बैठकाही घेण्यात आल्या. लाखोंचा जनसमुदाय येणार हे संयोजकांना पूर्वीच लक्षात आले होते. मोर्चेकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याचे नियोजन समितीने केले होते.

मराठा, मुस्लिम समाजाकडून मोर्चेकऱ्यांना पाणी वाटप
मोर्चेकऱ्यांना मराठा व मुस्लिम समाजातर्फे पाण्याचे पाऊच, लहान जार देण्यात आले. लिंगायत समाजबांधव लाखोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी झाले होते. बाहेरगावाहून अनेक लोक सकाळीच येथे दाखल झाले होते. त्यात आज उन्हाची तीव्रता अधिक राहिली. जिल्हा क्रीडा संकुल ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चा, पीस फोरम, जमियते उलेमा ए हिंद, जमआत इस्लामी हिंद, आझाद युवा संघटन, अपना वतन संघटना, स्टुडंटस इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया, मुस्लिम आरक्षण मोर्चा, मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस, असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शन ऑफ सिव्हिल राइट्‌स, मुस्लिम लॉयर्स असोसिएशन, जमियते अल कुरैश लातूर, ऑल इंडिया एकता फोरम, रहेनुमा फाउंडेशन या संघटनांतर्फे मोर्चेकऱ्यांना पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले.

Web Title: latur news police