पोलिस कोठडीत असलेल्या गुजरातच्या आरोपीचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

दीड महिन्यापूर्वी येथील एका ट्रॅव्हल्सला बार्शी परिसरात अडवण्यात आले होते. यात एका व्यापाऱयाजवळील पाच लाख रुपये चोरट्यांनी लुटले होते. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच गोवा, नागूपर येथून दोघांना अटकही केली होती. 

लातूर : येथील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या एका लुटप्रकरणातील गुजरातहून अटक करून आणलेल्या एका आरोपीचा रविवारी (ता. १५) रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्याचा मृत्यू टॉयलेट धुण्याच्या अॅसिडमुळे झाला की ह्रदयविकाराचा झटका आल्याने झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे.

दीड महिन्यापूर्वी येथील एका ट्रॅव्हल्सला बार्शी परिसरात अडवण्यात आले होते. यात एका व्यापाऱयाजवळील पाच लाख रुपये चोरट्यांनी लुटले होते. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच गोवा, नागूपर येथून दोघांना अटकही केली होती.  ता. १३ आक्टोबर रोजी गुजरातमधील नरेंद्रसिंह पृथ्वीसिंह हडियोळ (वय ४०, गुजरात) याला अटक केली होती. ता. १६ आक्टोबरपर्यत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. 

रविवारी (ता. १५) सकाळी स्वच्छतागृहात गेला होता. तेथे घाण असल्याने अॅसिड टाकून ते स्वच्छ केले.  थोड्याच वेळात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दिवसभर उपचारही करण्यात आले. रात्री त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.

Web Title: Latur news prisoner dead in custody