लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

देवणीनंतर निलंगा व औसा तालुक्यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यात शुक्रवारच्या पावसाची सरासरी 22 मिलीमीटर नोंद झाली आहे.  या पावसामुळे नदी नाल्यांना पाणी येऊन  भूजलाची पातळी वाढण्यास मदत झाली असून तलाव व प्रकल्पातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे.

लातूर : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 8) रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. यात देवणी तालुक्यातील तीनही महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. गुरूवारी (ता. सात) रात्री पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली होती. यात देवणी तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला होता. ती कमी पावसाने शुक्रवारी रात्री भरून काढली. देवणी तालुक्यात शुक्रवारी रात्री 93 मिलीमीटर पाऊस झाला. यात देवणी महसूल मंडळात 104,  वलांडी मंडळात 100 तर बोरोळ मंडळात 75 मिलीमीटर पाऊस पडला.  

देवणीनंतर निलंगा व औसा तालुक्यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यात शुक्रवारच्या पावसाची सरासरी 22 मिलीमीटर नोंद झाली आहे.  या पावसामुळे नदी नाल्यांना पाणी येऊन  भूजलाची पातळी वाढण्यास मदत झाली असून तलाव व प्रकल्पातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी रात्री तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. लातूर - नऊ, औसा - 21, रेणापूर - चार, अहमदपूर - चौदा, चाकूर - दहा, उदगीर - 11, जळकोट - 17, निलंगा - 24, देवणी - 93 व शिरूर अनंतपाळ - 19.

Web Title: Latur news rain in Latur