
या कार्यवाहीने मोटार सायकल गुन्हेगारांचे व चोरीच्या मोटरसायकल कमी पैशात विकत घेणाऱ्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.
उदगीर (जि.लातूर) : उदगीर शहर पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या पाच मोटरसायकल व ग्रामीण पोलिस ठाण्यातून चोरीस गेलेली एक मोटारसायकल अशा एकूण सहा मोटरसायकल (किंमत अंदाजे तीन लाख रुपये ) सराईत मोटरसायकल चोराकडून पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागील पाच ते सहा दिवसांत जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबवण्यात आली.
ग्रामसेवकाच्या आत्महत्येचे ‘झेडपी’त तीव्र पडसाद, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
या कार्यवाहीमध्ये शहर पोलिस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करणारे श्रीकृष्ण चामे, योगेश फुले, राजू घोरपडे, गजानन पुल्लेवाड, विपीन मामाडगे, पोलिस हवालदार संजय दळवे, मनोहर राठोड, धनाजी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या कार्यवाहीने मोटार सायकल गुन्हेगारांचे व चोरीच्या मोटरसायकल कमी पैशात विकत घेणाऱ्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. याप्रसंगी पोलीस निरीक्षक उबाळे यांनी ज्यांनी जुन्या मोटरसायकल खरेदी केल्या आहेत व त्यांना अद्याप विकणाऱ्याने मूळ अगर झेरॉक्स कागदपत्र दिलेली नाहीत.
गटविकास अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू
त्या मोटरसायकल चोरीच्या असू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या अंशतः रक्कम देऊन खरेदी केलेल्या जुन्या मोटरसायकल ज्यांचे कडे असतील, त्या मोटरसायकलची कागदपत्रे संबंधितांकडे नसतील तर त्यांनी तात्काळ सदर वाहने मोटरसायकली पोलिस ठाणे उदगीर शहर येथे हजर करून दाखवून ती चोरीची नसल्याबाबत खात्री करावी. अन्यथा पोलीस विभागास अशा मोटारसायकल मिळून आल्यास सदर मोटरसायकली जवळ ठेवणारे इसमावर कडक कारवाई होऊ शकते असे आवाहन केले आहे.
Edited - Ganesh Pitekar