सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

लातूर - सायबर गुन्ह्यांचा वाढता आलेख खाली आणण्यासाठी पोलिसांनी सेंटर ऑफ एक्‍सलन्स आणि कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अशा दोन यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पुढील काळात कमी होण्याची शक्‍यता आहे.

लातूर - सायबर गुन्ह्यांचा वाढता आलेख खाली आणण्यासाठी पोलिसांनी सेंटर ऑफ एक्‍सलन्स आणि कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अशा दोन यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पुढील काळात कमी होण्याची शक्‍यता आहे.

तांत्रिकदृष्ट्या तपास यंत्रणासाठी मोठे आव्हान असलेल्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र त्या तुलनेत या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. यावर ‘राज्यात सायबर गुन्ह्यांचा आलेख चढता’ असे वृत्त ‘सकाळ’मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर, पोलिस कोणकोणत्या उपाययोजना करीत आहेत, याची माहिती सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक बलसिंग रजपूत यांनी दिली. एका कार्यक्रमानिमित्त ते लातूरमध्ये आले होते. या वेळी त्यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

रजपूत म्हणाले, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे; पण त्या तुलनेने तपास लागत नाही, हे खरे आहे. त्यामुळे सेंटर ऑफ एक्‍सलन्स स्थापन होणार आहे. या माध्यमातून पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर समाजाच्या विविध स्तरांत जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी परिसंवाद, भेटीगाठी, व्याख्याने असे नानाविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यातून सायबर गुन्ह्यांची आणि अशा प्रकरणांत घ्यावयाची काळजी सांगितली जाणार आहे. सायबर गुन्ह्यांचा शोध तातडीने लावण्यासाठी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम तयार केली जाणार आहे. याचा उपयोग राज्यातील सर्व पोलिसांना होईल.

प्रत्येक जिल्ह्यात सायबर प्रयोगशाळा आणि सायबर पोलिस स्टेशन सरकारने याआधीच सुरू आहे. असे इतर राज्यांत कोठेही नाही; पण असे गुन्हे पोलिसांसाठी नवे आहेत. तरिही हे गुन्हे रोखण्यासाठी योग्य ती पावले सध्या उचलली जात आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: latur news Special campaign to stop cyber crime

टॅग्स