टक्केवारीची शंभरी गाठण्यात कला, क्रीडानेही दिली साथ!

हरी तुगावकर
बुधवार, 14 जून 2017

लातूर - दहावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना आतापर्यंत क्रीडा गुणांची सवलत होती; पण शासनाने यावर्षीपासून त्यात चित्रकला, लोककला, संगीत या विषयांची भर पडली. या सवलतीचा फायदा घेत शेकडो विद्यार्थ्यांनी टक्केवारीची शंभरी गाठली. दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाल्याने या मुलांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. शासनाच्या या सवलतीचा लातूर विभागातील साडेतीन हजार मुलांनी फायदा घेतला असून, त्यांचे गुण वाढण्यास मदत झाली आहे. 

दहावीच्या परीक्षेत आतापर्यंत मुलांना एखाद्या खेळात राज्य, राष्ट्रीयस्तरावर सहभाग घेतला किंवा पदक पटकाविले तर ग्रेस गुण दिले जात होते; पण यावर्षी शासनाने चित्रकला, लोककला, संगीत या विषयांतदेखील मुलांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला किंवा यश मिळविले तर त्यालाही ग्रेस गुण देण्याचा निर्णय घेतला. यात चित्रकला स्पर्धेत इंटरमिजिटमध्ये ‘ए’ दर्जाला १५, ‘बी’ दर्जाला दहा, ‘सी’ दर्जाला पाच गुण, संगीतात तीन परीक्षा पास झाल्यास दहा व पाच परीक्षा पास झाल्यास पंधरा, त्यापेक्षा जास्त परीक्षा दिल्यास १५ गुण, लोककलात ५० प्रयोगापर्यंत दहा गुण दिले जात आहेत. क्रीडामध्ये एखाद्या खेळात राज्यस्तरावर सहभाग १५, राज्यस्तरावर पदक किंवा राष्ट्रीयस्तरावर सहभाग दहा, तर राष्ट्रीयस्तरावर पदक मिळविलेले असल्यास २५ गुण दिले जात आहेत. लातूर विभागात या सर्व प्रकारांतील तीन हजार ४२२ मुलांनी या सलवतीच्या गुणांचा फायदा घेतला आहे. 

ज्या मुलांना दहावीच्या परीक्षेत ९६ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत त्यांना तर या सवलतीच्या गुणांचा अधिकच फायदा झाला आहे. त्यात बेस्ट ऑफ फाईव्हची सवलत आहे. त्यामुळे शेकडो मुलांनी टक्केवारीची शंभरी गाठली. दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाल्याने या मुलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

नऊ शाळांचा शून्य टक्के निकाल
लातूर, ता. १३ ः दहावीच्या परीक्षेत लातूर विभागातील नऊ शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. तर १३३ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.  लातूर विभागात एक ते दहा टक्के निकाल लागलेल्या दोन, १०.०१ ते वीस टक्‍क्‍यांत सात, २०.०१ ते ३० टकक्‍यांत सात, ३०.०१ ते ४० टक्‍क्‍यांत १३, ४०.०१ ते ५० टक्‍क्‍यांत ३३, ५०.०१ ते ६० टक्‍क्‍यांत ७१, ६०.०१ ते ७० टक्‍क्‍यांत १४३, ७०.०१ ते ८० टक्‍क्‍यांत २७३ शाळा आहेत. ८०.०१ ते ९० टक्‍क्‍यांत ५१३, तर ९०.०१ ते ९९.९९ टक्‍क्‍यांत ४८४ शाळा आहेत. तर १३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Web Title: latur news ssc result student