बसची चाके थांबल्याने जायचे आणि यायचेही राहून गेले...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

राज्य परिवहन महमंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल झालेले पहावयास मिळाले.नांदेड ते सोलापूर ही एस.टी.बस रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अहमदपूरात येते.यात दोन महिलांचे सोलापूर पर्यंत आरक्षण असतानाही त्यांना सोमवारच्या मध्यरात्री अहमदपूर बसस्थानकावर उतरवण्यात आले.मंगळवारच्या सकाळी खासगी वाहनाच्या सहाय्याने त्यांना सोलापूरला रवाना व्हावे लागले

अहमदपूर - दिवाळसणाच्या मुहूर्तावरच एस.टी.बसची चाके थांबल्याने अनेकांचे या सणासाठी जायचे; तर अनेकांचे आप्तस्वकीयांकडे यायचे राहून गेले आहे.         

 राज्य परिवहन महमंडळाच्या कर्मचा-यांनी सातवा वेतन आयोग द्यावा आणि इतर अनुषंगिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारच्या (ता.16) मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट होता.मात्र या संपाचा फायदा घेत खासगी वाहतूकदारकांची 'दिवाळी' साजरी झाली.सहा आसनी रिक्षा, टेंपो, मिनी टेंपो, ऑटोरिक्षा या वाहनांच्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास अंतरावराच्या प्रवाशांची ये-जा झाली.मात्र दूर अंतरावर जाणा-या  व येणा-यांना आपला प्रवासाचा बेत रद्द करावा लागला.

अहमदपूर बस आगारातील 81 पैकी 80 तर गंगाखेड व कंधार बस आगाराच्या प्रत्येकी दोन तसेच उदगीर, परळ व मलकापूर या बस आगारांच्या प्रत्येकी एक अश्या एकुण 88 बसगाड्या अहमदपूर बस आगारात उभ्या होत्या. या संपात अहमदपूर बस आगारातील चालक 225 , वाहक 195 , यांत्रिक 51 तर प्रशासकीय 36 जणांनी आपला सहभाग नोंदवला.

राज्य परिवहन महमंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल झालेले पहावयास मिळाले.नांदेड ते सोलापूर ही एस.टी.बस रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अहमदपूरात येते.यात दोन महिलांचे सोलापूर पर्यंत आरक्षण असतानाही त्यांना सोमवारच्या मध्यरात्री अहमदपूर बसस्थानकावर उतरवण्यात आले.मंगळवारच्या सकाळी खासगी वाहनाच्या सहाय्याने त्यांना सोलापूरला रवाना व्हावे लागले.   

राज्य परिवहन महमंडळाच्या कर्मचा-यांनी ऐन दिवाळीतच संप पुकारल्याने त्यांच्या व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात प्रवाश्यातून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: latur news: st strike