उड्डाण पुलावरून उडी टाकून एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

लातूरः येथील शिवाजी चौकातील उड्डाण पुलावरून एका व्यक्तीने आज (शुक्रवार) सकाळी साडे सातच्या दरम्यान उडी टाकून आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

लातूरः येथील शिवाजी चौकातील उड्डाण पुलावरून एका व्यक्तीने आज (शुक्रवार) सकाळी साडे सातच्या दरम्यान उडी टाकून आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

येथील शिवाजी चौक परिसरात सकाळपासूनच रहदारी असते. तसेच शहरात ठिकठिकाणी कामाला जाणारे कामगारही या चौकात उभारलेले असतात. आज सकाळी साडे सातच्या सुमारास एका व्यक्तीने उड्डाण पुलावरून खाली उडी मारली. एकमद आवाज आल्याने एकच गर्दी झाली. शिवाजी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस व वैद्यकीय पथक येईपर्यंत या व्यक्तीचे मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवली. खोरीगल्लीत चहाची टपरीचा व्यवसाय करणारे बाबुराव व्हरे (वय ४०) असे या आत्महत्या करणाऱया व्यक्तीचे नाव आहे. हे गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या आजाराने त्रस्त होते. तसेच कौटुंबिक कलह होता. यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोवर्दन भूमे यांनी दिली.

Web Title: latur news suicides by flying over the bridge