तरुणांच्या दगडफेकीमुळे लातूर झाले बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

सुरेश चव्हाणके यांच्या अटकेचा निषेध; चौघे पोलिसांच्या ताब्यात

लातूर: राष्ट्र निर्माणचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांना तेलंगानात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त येथे आज (शुक्रवार) (ता. १६) दुपारी पोहचले. त्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सायंकाळच्य सुमारास शहरात दुचाकी फिरत अनेक ठिकाणी दगडफेक केली. यातून अवघ्या काही क्षणात लातूर शहरातील बाजारपेठ बंद झाली. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर पोलिसांनी आपली दुकाने उघाडावीत असे आवाहन करीत व्यापाऱय़ांना दिलासा दिला.

लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी श्री चव्हाणके यांची भारत बचाओ रथयात्रा गुरुवारी (ता. १५) येथे आली होती. त्यानंतर ही रथयात्रा पुढे तेलंगानात गेली. तेथे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आज दुपारी आले. सायंकाळच्या वेळेस काही तरुणांनी मोटार सायकलवर फिरुन सुरवातीला शिवाजी चौकातील काही दुकानावर दगडफेक करीत दुकान बंद करा असे म्हणत दहशत पसरवली. अचानक दगडफेक सुरु झाल्याने व्यापाऱय़ात भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर हे तरुण मुख्य रस्त्यांनी गांधी चौक मार्गे गोलाईक़डे गेले. तेथेही त्यांनी अनेक दुकानावर दगडफेक केली. या घटनेची माहिती वाऱय़ासारखी शहरात पसरली. अवघ्या काही
क्षणात लातूर शहरातील बाजारपेठ बंद झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक शिलवंत ढवळे, शहरातील चारही पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी रस्तयावर आले. आठ ते दहा पोलिसांच्या गाड्या रस्त्यावर आल्या. पोलिसांनी पहिल्यांचा चार तरुणांना ताब्यात घेवून गांधी चौक पोलिस ठाण्यात नेवून ठेवले. त्यानंतर लाऊड स्पीकरवर आपली दुकाने उघडण्याचे आवाहन पोलिसांनी व्यापाऱय़ांना केले. त्यानंतर व्यापाऱयांनी आपली दुकाने उघडण्यास सुरवात केली. पण एक दीड तास नेमके काय झाले हेच कोणालाही कळत नव्हते. अनेक पोलिसही याबाबत अनभिज्ञ होते.

Web Title: latur news suresh chavhanke latur bandh