या विभागात सुरु झाला पुन्हा पदोन्नतीसाठी होकार, नकाराचा खेळ... 

teacher.jpg
teacher.jpg

लातूर : विवाह जमवण्याच्या प्रयत्नात सतत नकार मिळावा, तशी स्थिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची झाली आहे. यातूनच मुख्याध्यापकाच्या ४८ रिक्त जागांसाठी जिल्हा परिषदेने पदोन्नतीचे होकार देणाऱ्या शिक्षकांचे संशोधन सुरू करीत पदोन्नतीसाठी पात्र शिक्षकांची यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे पात्र शिक्षकांत पुन्हा होकार व नकारांचा खेळ सुरू झाला असून, तो घेऊनच ही यादी २० ऑगस्टपर्यंत अंतिम होणार आहे. त्यानंतर होकार देणाऱ्यांच्या गळ्यात मुख्याध्यापकपदाची माळ पडणार आहे.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश   
शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू केल्यानंतर शिक्षक संघटनांनी आधी पदोन्नत्यांनंतरच बदल्या करण्याची भूमिका घेतली. यामुळे जिल्हा परिषदेने पदोन्नतीचे काम सुरू केले आहे. दरम्यान, प्रशासकीय बदल्या रद्द झाल्या आणि पदोन्नतीचे काम तडीस नेण्यास सुरवात केली आहे. पहिला टप्पा म्हणून पात्र शिक्षकांची प्रारूप ज्येष्ठता यादी जाहीर केली असून, त्यानुसार संबंधित शिक्षकांचा होकार व नकार घेऊन अद्ययावत यादी सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये होकार व नकाराची भाषा सुरू झाली आहे. 

नकार सांगितलेल्यांना पुन्हा संधी 
जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या ९७९ शिक्षकांच्या प्रारूप यादीत काही सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचाही समावेश आहे. यात २०१७ मध्ये पदोन्नतीस नकार दिलेल्या २९३, २०१८ मध्ये नकार दिलेल्या ३०१, २०१९ मध्ये नकार दिलेल्या ५८, तर नवीन ३२७ शिक्षकांचा समावेश आहे. यातील २०१७ मध्ये नकार दिलेल्या २९३ शिक्षकांना पुन्हा पदोन्नतीची संधी चालून आली असून, तीन वर्षांनंतर पुन्हा ते पदोन्नतीसाठी पात्र ठरले आहेत. या शिक्षकांनाही होकार व नकार कळवावा लागणार आहे. गैरसोयीच्या ठिकाणी पदोन्नतीने नियुक्ती, जबाबदारीचे काम व अन्य कारणांमुळे शिक्षक नकार देतात. यामुळे पदोन्नतीला किती शिक्षक होकार व नकार देतात, याची उत्सुकता लागली आहे. 

प्रारूप यादीत सेवानिवृत्तांची नावे असू शकतात. यामुळेच यादी अद्ययावत करण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी नकार दिलेले शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. यामुळे त्यांनाही होकार व नकार देण्याची संधी आहे. पदोन्नतीनंतर सोयीचे ठिकाणी मिळत नाही म्हणून बहुतांश शिक्षक नकार देतात. ऑनलाइन तसेच जबाबदारीच्या कामांमुळे काहीजण नकार कळवतात. नकार देणाऱ्यांत महिलाही आहेत. असे असले तरी अनेकजण उत्साहाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढे येतात. यामुळे पदोन्नतीसाठी शिक्षकांची कमी भासणार नाही. 
- डॉ. वैशाली जामदार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, लातूर. 
 

Edit By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com