कलेच्या मंदिराला घाणीने वेढले!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

उदगीर - येथील प्रियदर्शिनी कलामंदिर परिसरात प्रशासनाच्या देखभालीअभावी घाणीचे साम्राज्य बनले आहे. लाखो रुपये खर्चून बांधलेले हे कला मंदिर दुरुस्तीच्या किरकोळ खर्चाअभावी अनेक महिन्यांपासून वापरात नाही. काँग्रेसच्या कालावधीत तर उद्धार झाला नाही, किमान आता भाजपच्या कालावधीत तरी या कलामंदिराचा उद्धार होईल का याकडे कलाप्रेमी, रसिकांचे लक्ष लागले आहे. 

कलामंदिरमुळे शासनाचे लाखो रुपये वाचू शकतात. निवडणूक काळात निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येकवेळी चित्रपटगृह किंवा मंगल कार्यालय भाड्याने घ्यावे लागते. हा खर्च या कलामंदिरामुळे पूर्णपणे वाचू शकतो. सध्या शहरात चालू असलेला शारदोत्सव हा उघड्या मैदानावर घ्यावा लागत आहे. यासाठी मंडप, स्टेज आणि टेंटचा आगाऊ खर्चही करावा लागत आहे. कलामंदिरामुळे प्रतिवर्षी होणारा हा खर्च वाचणार आहे. राजकीय सभा, बैठका घेण्यासाठी बंदिस्त सभागृह उपलब्ध झाले तर यातून उत्पन्न मिळणार आहे. उदगीर येथे दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या आयोजकांना शहरातील मंगल कार्यालयांत भरमसाट रक्‍कम मोजावी लागते. अशा कार्यक्रमासाठी कलामंदिर हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे उदगीरकरांची कलेची भूक भागविली जाऊ शकते.

नावाचे तर वावडे नाही...!
निवडणुकांपूर्वी भाजपने नगरपालिकेत सत्ता आली तर प्रियदर्शिनी कलामंदिर दुरुस्त करून जनतेसाठी खुले करण्याचे आश्‍वासन दिले होते. याची आठवण जनता करून देत आहे. उदगीरच्या राजकारण्यांना प्रियदर्शिनी नावाचे तर वावडे नाही ना अशी चर्चा उदगीरकरांमध्ये आहे. कारण यापूर्वी प्रियदर्शिनी नावाने असलेला साखर कारखानाही उदगीरचे नेते नीट चालवू शकले नाहीत आणि आता हे कलामंदिरही नीट चालू केले जात नाही. यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.

प्रियदर्शिनी कलामंदिरचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले आहे; मात्र कलामंदिर जरी नगरपरिषदेने त्या काळात बांधले असले तरी ही जागा महसूल विभागाची असल्यामुळे काही तांत्रिक बाबींमुळे उशीर होत आहे. लवकरच या त्रुटी दूर करून नव्या रूपात कलामंदिर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
- बसवराज बागबंदे, नगराध्यक्ष.

Web Title: latur news udgir school