उदगीरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार 

युवराज धोतरे
रविवार, 16 जुलै 2017

घराकडे परतत असताना शाहू चौक रस्त्यातील बोळात अज्ञात तीन जणांनी तोंडावर दस्ती टाकून हात पाय बांधून शहराबाहेर नेले.

उदगीर : उदगीर शहरातील शाहु चौक परिसरातील रस्त्यावरून ऑटो रिक्षामधून एक महिला घराकडे जात असताना तिला पकडून तिचे तोंड दाबून धरून शहराबाहेर नेऊन तिच्यावर अज्ञात तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (ता 13) रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान शेल्हाळ रोडवर असलेल्या उदयगिरी रूग्णालयात उपचार घेऊन ऑटो रिक्षामध्ये बोधननगरमधील घराकडे परतत असताना शाहू चौक रस्त्यातील बोळात अज्ञात तीन जणांनी तोंडावर दस्ती टाकून हात पाय बांधून शहराबाहेर नेले.

तेथे कपडे फाडले व बलात्कार केला. सदर महिलेच्या जवाबावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: latur news udgir woman raped brutally