मंजूर केलेल्या विकासकामांचे श्रेय घेणे बंद करा, माजी आमदार भालेराव यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना आवाहन

Sudhakar Bhalerao News Udgir
Sudhakar Bhalerao News Udgir

उदगीर (जि.लातूर) : उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षात मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे श्रेय घेणे बंद करावे असे आवाहन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांना केले आहे. शुक्रवारी (ता.१२) श्री.भालेराव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी धर्मपाल नादरगे, वसंत शिरसे, लक्ष्मण जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, शिवाजी भोळे, माधव टेपाले आदी उपस्थित होते.


श्री.भालेराव म्हणाले, की गेल्या वर्षभरापासून मी बघत आहे. मी आमदार असताना उदगीर मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या-ज्या योजना मंजूर केल्या त्याच योजना नवीन कार्यारंभ आदेश काढून त्याचे नारळ फोडून उद्घाटन करण्याचे सत्र राज्यमंत्री बनसोडे हे चालवत आहेत. मी केलेल्या विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी कोठेही पुढाकार घेतला नाही. ना त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र मतदारांची दिशाभूल करून ही विकास कामे मी मंजूर करून आणली असे सांगत मतदारांची दिशाभूल करून हे करण्यात येत असलेले प्रकार अत्यंत चुकीचे आहेत.


अटल अमृत योजनेअंतर्गत लिंबोटी उदगीरला पाणीपुरवठा योजनेचे काम माझ्या काळात मंजुर झाले असून ते आता पूर्णत्वास आले आहे. उदगीरचा एमआयडीसीचा प्रश्न मी लावून धरला. त्या प्रश्नाविषयी माझे विधानसभेत निवेदन केले आहे. त्याचा प्रस्ताव मी सादर केला व त्याची मंजुरी मी मिळवली आहे. उदगीर शहराला जोडणारे नांदेड जळकोट बिदर व आष्टामोड ते देगलूर हे राष्ट्रीय महामार्ग माझ्या प्रयत्नामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले. त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. मलकापूर वळण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल मी मंजूर करून आणले आहे. याशिवाय अनेक विकास कामे मी मंजूर केलेली असताना राज्यमंत्री बनसोडे यांनी त्याचे श्रेय घेण्याचे सत्र चालवले आहे.


उदगीर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपणाला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. शिवाय मंत्रिपदाची संधी ही आपणास मिळाली असून त्या संधीचे सोने करावे. भरभरून विकास कामे उदगीर मतदारसंघात आणावेत. यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र मी मंजूर करून आणलेल्या विकास कामांची उजळणी करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असेही आमदार भालेराव यांनी यावेळी सांगितले.

गर्दी जमवल्या प्रकरणी कार्यवाही व्हावी
शुक्रवारी (ता.१२) राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीर येथे आले असताना एमआयडीसीसह अनेक विकास कामे मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी चौकात त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याने संबंधितावर ठोस कारवाई करण्याची मागणी यावेळी भालेराव यांनी केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com