खोलीकरणावेळी उन्हाळ्यात लागले नाल्याला पाणी...! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

जळकोट - तालुक्‍यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नाला खोलीकरण, नाला सरळीकरणाची कामे सुरू आहेत. वांजरवाडा (ता. जळकोट) येथे हे काम सुरू असताना कडाक्‍याच्या उन्हात मे महिन्यात पाणी लागल्यामुळे ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे. 

वांजरवाडा येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे सुरू असून दहा बीटचे काम मंजूर झाले आहे. मागील दहा दिवसांपासून दोन यंत्रांद्वारे हे काम चालू आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आमदार सुधाकर भालेराव, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, तहसीलदार डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे चालू आहेत. 

हे काम करत असताना नाला खोलीकरणात ऐन उन्हाळ्यात गावालगत असलेल्या शिवारात पाणी लागले. त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. मे महिन्यात पाणी लागल्यामुळे अनेकजण हे पाणी पाहायला येत आहेत. 

Web Title: latur news villagers happy for Water in the summer