‘अमृत’च्या कंत्राटदाराला दररोज लाखाचा दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

लातूर - लातूर शहरासाठी नियमित पाणीपुरवठा करता यावा या करिता केंद्र शासनाच्या वतीने अमृत योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. गेल्या नऊ महिन्यांत केवळ वीस ते पंचवीस टक्केच काम झाले आहे. अठरा महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे; पण सध्याची कामाची प्रगती पाहता हे काम वेळेत पूर्ण होईल असे दिसत नाही. हे लक्षात आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी या योजनेचे काम करणारे कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. यात प्रतिदिन एक लाखाचा दंड आकारण्यात येत आहे, असा इशारा दिला आहे. 

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत लातूर शहर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम एस. डी. लहाने हे कंत्राटदार काम करीत आहेत; पण गेल्या काही महिन्यांपासून हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत या कंत्राटदाराला दोन पत्रेही देण्यात आली होती. या कामाची गती वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. कामाची प्रगती असमाधानकारक दिसून आल्यास स्वीकृत निविदेतील अटी व शर्तीनुसार आपल्याविरद्ध नाईलाजास्तव  दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही यापूर्वीच कंत्राटदाराला देण्यात आला होता. तरीदेखील या कामाची प्रगती समाधानकारक झाली नाही. त्यामुळे कामाच्या गतीमध्ये सुधारणा नसल्यामुळे सदर कामास ता. २५ जुलैपासून एक लाख रुपये प्रतिदिवस एवढा दंड आकारण्यात येत आहे. याची नोंद घेऊन कामाची गती वाढवावी. दिलेल्या निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यात यावीत, कामाची गती वाढवून सदर काम विहित कालमर्यादेत पूर्ण केल्यास सदर दंडाबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे. आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर तरी कंत्राटदार कामाची गती वाढवणार का याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: latur news water pipeline

टॅग्स