Latur Corona Warrior : कोरोनावर मात करून त्यांनी पुन्हा घेतली हाती काठी...

police latur.jpg
police latur.jpg

लातूर :  गेल्या तीन चार महिन्यांपासून लातूरकरांना कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून रात्रंदिवस रस्त्यावर काम करणारे गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांना कोरोनाची लागण झाली होती. या कोरोनाच्या आजारावर त्यांनी यशस्वी मात केली. इतकेच नव्हे तर पहिल्याच जोशाने ते कामासाठी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी (ता. १५) पंधरा दिवसाचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. पोलिस ठाण्याच्या इतर पोलिसांच्या पूर्वी ते आज रस्त्यावर काठी घेवून दिसले. रस्त्यावरून जाणाऱया प्रत्येक वाहनाची ते चौकशी करीत होते.

शहरातील नागरीकांना कोरोनाची लागण होवू नये म्हणून कोरोना योद्धा म्हणून पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर काम करीत आहेत. यात ता. २० मे रोजी श्री. हिबारे यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाग्रस्त झालेले ते जिल्ह्यातील पहिलेच अधिकारी होते. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्यही कोरोनाबाधित झाला होता. 


श्री. हिबारे यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत चौदा दिवस उपचार करण्यात आले. ऑक्सीजनवरच त्यांना ठेवावे लागले होते. त्यानंतर त्यांना ता. तीन जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसापूर्वी ते कर्तव्यावर रुजू झाले होते. त्यात बुधवारपासून पंधरा दिवसाचा लॉकडाऊऩ सुरु झाला आहे. सकाळपासूनच श्री. हिबारे रस्त्यावर दिसून आले. कोरोनावर यशस्वी मात केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱय़ावर होता. रस्त्यावरून जाणाऱया प्रत्येकाला अडवून ते चौकशी करीत होते. पहिल्याच जोशाने ते आता काम करू लागले आहेत.

नागरीकांनी कोरोनाला घाबरू नये. त्यावर यशस्वीपणे मात करता येते. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत चांगले उपचार करण्यात येत आहेत. याचा मी अनुभव घेतला आहे. माझ्या डायटमध्ये काहीही फरक पडलेला नाही. आयुर्वेदिक काढा घेत आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर आहे. नागरीकांनी काळजी घ्यावी पण घाबरू नये.

संजय हिबारे, पोलिस निरीक्षक, गांधी चौक, पोलिस ठाणे 

(संपादन : प्रताप अवचार )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com