राज्यस्तरीय युवा महोत्सवात लातूर अव्वल : Photos

सुशांत सांगवे
Tuesday, 7 January 2020

लातूर : युवकांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवातील स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ६, द्वितीय क्रमांकाची २ तर तृतीय क्रमांकाचे १, अशी ९ पारितोषिके मिळवून लातूर अव्वल ठरले आहे.

लातूर : युवकांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवातील स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ६, द्वितीय क्रमांकाची २ तर तृतीय क्रमांकाचे १, अशी ९ पारितोषिके मिळवून लातूर अव्वल ठरले आहे.

मुंबई, नाशिक, नागपूर या विभागाने दुसऱ्या स्थानावर प्रत्येकी सहा पारितोषिकांवर आपली मोहोर उमटवत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर पुणे, औरंगाबाद, अमरावती विभागाने प्रत्येकी पाच पारितोषिके मिळवत स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

Image may contain: 7 people, people smiling, people standing

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

गेल्या तीन दिवसांपासून लातूरात युवा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात गायन, वादन, नृत्य अशा वेगवेगळ्या १८ प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. वीणा वादन आणि मणिपूरी नृत्यासाठी स्पर्धक सहभागी न झाल्याने १६ प्रकारच्या स्पर्धा महोत्सवात घेण्यात आल्या.

यात राज्याच्या कानाकोपऱ्यातील ३००हून अधिक युवा स्पर्धक सहभागी झाले होते. दयानंद महाविद्यालयाचे सभागृह, दगडोजी देशमुख सभागृह आणि क्रीडा संकुलाच्या मैदावर या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेचा निकाल जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी सोमवारी (ता. ) जाहीर केला.

Image may contain: 6 people, people smiling, people on stage and people dancing

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

लातूरात यंदा प्रथमच राज्यस्तरीय महोत्सव घेण्यात आला. या स्पर्धेत लातूरमधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. लोकनृत्य स्पर्धेत आराधी ग्रुप, लोकगीत स्पर्धेत मंगळागौर ग्रुप, सतार वादन स्पर्धेत श्रृती देशपांडे, बासरी वादन स्पर्धेत विनायक जोशी, गीटार वादन स्पर्धेत धनंजय वीर, भरतनाट्यम स्पर्धेत अथर्व चौधरी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

वक्तृत्व स्पर्धेत सोनी गीता, कुचिपूडी नृत्यात श्रद्धा कांबळे यांनी द्वितीय तर शास्त्रीय गायन स्पर्धेत चैतन्य पांचाळ यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांसह पारितोषिक मिळविल्या इतर विभागातील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Image may contain: 5 people, people smiling, people on stage

धक्कादायक -  तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

हे आहेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थी
लोकनृत्य : आराधी (लातूर), गऊर (मुंबई), कोळी (अमरावती), लोकगीत : मंगळागौर (लातूर), गोविंदा रे गोपाळा (मुंबई), या पोरानं दाखवली मुंबई (औरंगाबाद), एकांकिका : रिप्लेसमेंट (मुंबई), चिडिया (नाशिक), पुराषार्थ (अमरावती), शास्त्रीय गायन : प्रज्योत म्हैसकर (नागपूर), नवलकुमार जाधव (अमरावती), चैतन्य पांचाळ (लातूर), शास्त्रीय गायन (कर्नाटकी) : विवेक टी. ., सतार वादन : श्रृती देशपांडे (लातूर), केतकी गोऱ्हे (नाशिक), बासरी वादन : विनायक जोशी (लातूर), राजेश आगलावे (नाशिक), सुमित वासनकर (अमरावती), तबला वादन : सुधांशू परळीकर (औरंगाबाद), अक्षय जवादे (नागपूर), आदित्य उपाधे (मुंबई), मृदंग वादन : आसाराम साबळे (पुणे), निखिल गलधर (औरंगाबाद), सुहास गवळी (कोल्हापूर), हार्मोनिअम : प्रज्योत म्हैसकर (नागपूर), गणेश राऊत (अमरावती), पवनकुमार शिंदे (औरंगाबाद), गीटार वादन : धनंजय वीर (लातूर), बापूसाहेब वीर (औरंगाबाद), ऋषिकेश बोरसे (नाशिक), ओडिसी नृत्य : वैष्णवी वेलये (मुंबई), त्रीशा पाठक (पुणे), भरतनाट्यम : अथर्व चौधरी (लातूर), स्नेहल कुलकर्णी (पुणे), शेखर शिंदे (नाशिक), कथ्थक : नमिता राऊत (नागपूर), देवश्री ठाले (मुंबई), कोमल चव्हाण (नाशिक), कुचिपूडी नृत्य : तन्मयी गजभीये (नागपूर), श्रद्धा कांबळे (लातूर), वक्तृत्व स्पर्धा : झुबीया रहीम (पुणे), सोनी गीता (लातूर), रितेश तिवारी (नागपूर).

जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur top in State Level Youth Festival Maharashtra News