पेरणी
पेरणीफाईल

उमरगा तालुक्यात रब्बीच्या 30 टक्के पेरणी

अतिवृष्टीमुळे जमिनीत ओलावा असल्याने बऱ्याच कालावधीनंतर रब्बी पेरणीला सुरुवात झाली.

उमरगा : महिनाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बरेच क्षेत्र पेरणीसाठी लवकर तयार होत नसल्याने रब्बी पेरणीला विलंब होत आहे. सोमवारपर्यंत (ता. आठ) १३ हजार ८२५ हेक्टर क्षेत्रावर (२९.७२ टक्के) पेरणी झाली असून, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्याने पेरणीचे काम सुरू केले आहे. अतिवृष्टीच्या एका तडाक्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. शेतजमिनीबरोबरच पिकेही पाण्यात अडकली.

शासनाने दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जिरायती व बागायत शेतीला दहा हजार अनुदान जाहीर केले. पण, ही रक्कम एकूण नुकसानीच्या पंचवीस टक्केच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनुदान रक्कमेवरून सत्ताधारी- विरोधकात राजकीय धुळवड झाली; पण शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा आली. हेक्टरी दहा हजार रुपये अनुदानाची रक्कम जाहीर झाली. मात्र, पंचनाम्यात फक्त बाधित क्षेत्रच गृहित धरण्यात आले. दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन कमी-अधिक प्रमाणात बाधित झाले होते. मात्र, जेथे पाणी तेथीलच क्षेत्र बाधित धरल्याने मिळणारे अनुदानाची रक्कम तुटपुंजी आहे. दरम्यान, ऐनवेळी महसूल प्रशासनाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून प्राप्त झालेल्या २३ कोटी दोन लाख रक्कमेपैकी २० कोटी ७८ लाखाची रक्कम आयसीसीआय बँकेकडे वर्ग केली होती.

पेरणी
आयुष्य जगायला शिकवणारे 'छंद'!

तेथून संबंधित शाखेला रक्कम वर्ग झाली. अशी झाली पेरणी यंदा रब्बी हंगामाचे ४१ हजार ४१५ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. पीकनिहाय सरासरी क्षेत्र व कंसात पेरणी झालेले क्षेत्र, टक्केवारी पुढीलप्रमाणे : ज्वारी-सोळा हजार सातशे हेक्टर (तीन हजार ९६०/२३.७१ ), गहू-दोन हजार ४७५ हेक्टर (५७८ /२३.३५), सोळा हजार ८४५ हेक्टर ( आठ हजार ३२५ / ४९.४२), करडई - तीन हजार १४ हेक्टर (तीन हजार ९२०/३०.५१), जवस - ४१४ हेक्टर ( २५/६.०९), सूर्यफूल- एक हजार ४७० ( १७ / १.१६).

बाराशे शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे रब्बी हंगाम २०२१-२२ हरभरा बियाणे प्राप्त होण्यासाठी कृषी विभागाने परमीट लकी ड्रॉ पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली. त्यात पंचवीस टक्के अनुदानावरील तीस किलो हरभरा बियाणाचे वाटप संबंधित विक्रेत्याकडून देण्याचे काम सुरू आहे. एक हजार १२७ क्विंटल हरभरा बियाणांचे लक्ष्यांक आहे. त्यापैकी ७७७ क्विंटल हरभरा बियाणांची उपलब्धता झाली असून, बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे घेतले आहे. मात्र, बियाणाचा तुटवडा असल्याने अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यासाठी महाबीज कंपनीकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती अतिरिक्त तालुका कृषी अधिकारी एम. बी. बिडबाग यांनी सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com