लातूर - उस्मानाबाद - बीड’ची मतमोजणीचा ११ जुनपूर्वी करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

बीड : राजकीय प्रतिष्ठेच्या आणि विविध कारणांनी गाजलेल्या ‘लातूर - उस्मानाबाद - बीड’ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतमोजणी ११ जुनपूर्वी करण्याचे निर्देश सेामवारी (ता. २८) निवडणुक आयेागाने दिले. लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले अशोक जगदाळे व भाजपचे सुरेश धस यांच्यात ही लढत झाली. २१ मे ला मतदान होइल तर  २४ मे ला मतमोजणी होणार होती.

मात्र, बीड पालिकेतील दहा व शिरुर कासार पालिकेतील एका नगरसेवकाला अपात्र केल्यानंतर त्यांच्या मतदानाच्या हक्काबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल झाली होती. यावरुन जर दोन्ही उमेदवारांच्या मतांमधील फरक दहा किंवा त्यापेक्षा कमी असेल तर निकाल अन्यथा या याचिकेचा अंतिम निकाल लागल्यानंतरच निवडणुकीचा निकाल असे आदेश सुरुवातीला खंडपीठाने दिले होते. यानंतर असा प्रकार म्हणजे गुप्त मतदान पद्धतीचा भंग ठरेल असा अर्ज बीडच्या नगरसेवकांनी खंडपीठ आणि निवडणुक आयेागाला दिला होता. यावर ता. सहा रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सोमवारी निवडणूक आयोगाने ही प्रक्रीया येत्या ११ जुनपर्यंत पार पाडण्याचे निर्देश दिल्याने आता यापूर्वी मतमोजणी होऊन निकाल लागणार हे निश्चित झाले आहे. आता मतमोजणीची तारीख नेमकी कोणती ठरते याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: latur -usmanabad - beed's counting of votes should complete before 11 june