"लातूर विकास पॅटर्न' तयार करू - फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

लातूर - लातूरने शिक्षण क्षेत्रात "लातूर पॅटर्न' निर्माण केला आहे. या पॅटर्नच्या मागे उभा महाराष्ट्र फिरतो आहे. महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात द्या, "लातूर विकास पॅटर्न' तयार करून दाखवू. या विकासाच्या पॅटर्नमागे इतर शहरांनी फिरले पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. 

महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित परिवर्तन सभेत ते बोलत होते. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. आतापर्यंत लातूरचे महापौर हे "कठपुतली'सारखे होते. निर्णय कोठे व्हायचे हे मी सांगण्याची गरज नाही. 

निर्णय घेणाऱ्यांना लातूरचे काही देणे-घेणे नाही. जुन्या पुण्याईवर ते आता मते मागायला येत आहेत. मते घ्यायची अन्‌ जनतेला विसरून जायचे. किती दिवस जुन्या पुण्याईवर मते मागणार, तुम्ही काय केले ते सांगा, असा प्रश्न फडणवीस यांनी या वेळी उपस्थित केला. 

महापालिका आमच्याकडे आल्यानंतर मला तीन वर्षांचा वेळ द्या, मी तुम्हाला वचन देतो लातूरची पाणी समस्या ही भूतकाळ असेल, पाण्यासाठी तुम्हाला तडफडावे लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

Web Title: latur vikas pattern