लातूरच्या भूजल पातळीत 1.75 मीटरने घट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

गेल्या काही महिन्यांपासून लातूर तालुक्‍यात पाण्याचा मोठा उपसा आहे. मे महिन्यात घेतलेल्या भूजल चाचणीत लातूर तालुक्‍याची भूजल पातळी मागील पाच वर्षाच्या सरासरी पातळीच्या तुलनेत तीन मीटरने खाली गेली आहे. तर, जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी 1.75 मीटरने घट झाली आहे. ही चिंताजनक बाब असून, भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात आणखी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

लातूर - गेल्या काही महिन्यांपासून लातूर तालुक्‍यात पाण्याचा मोठा उपसा आहे. मे महिन्यात घेतलेल्या भूजल चाचणीत लातूर तालुक्‍याची भूजल पातळी मागील पाच वर्षाच्या सरासरी पातळीच्या तुलनेत तीन मीटरने खाली गेली आहे. तर, जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी 1.75 मीटरने घट झाली आहे. ही चिंताजनक बाब असून, भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात आणखी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील भूजल पातळीची चाचणी घेण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील 109 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवली होती. या वर्षी पाऊस लांबला तर पाणी टंचाई अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Water Lavel Decrease