"यिन'च्या शहर जिल्हाध्यक्षपदी साखरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

लातूर - यंग इन्स्पिरेटर्सच्या नेटवर्कच्या (यिन) शहर जिल्हाध्यक्षपदी अमर साखरे, उपाध्यक्षपदी विशाखा पाटील आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रेमला मुसळे, उपाध्यक्षपदी संभाजी कदम यांची सोमवारी (ता. 14) निवड झाली. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल घोषित होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. 

लातूर - यंग इन्स्पिरेटर्सच्या नेटवर्कच्या (यिन) शहर जिल्हाध्यक्षपदी अमर साखरे, उपाध्यक्षपदी विशाखा पाटील आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रेमला मुसळे, उपाध्यक्षपदी संभाजी कदम यांची सोमवारी (ता. 14) निवड झाली. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल घोषित होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. 

"यिन'च्या माध्यमातून मागील महिन्यात जिल्ह्यातील 47 महाविद्यालयांत अध्यक्ष व उपाध्यक्षांची मतदान प्रक्रियेद्वारे निवड झाली होती. महाविद्यालयीन अध्यक्ष व उपाध्यक्षांतून जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारी दि व्हर्टेक्‍स ऍकॅडमीच्या सभागृहात निवडणूक झाली. सर्वप्रथम लेखी परीक्षा, भाषण कौशल्य स्पर्धा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे गुणदान करून शहर व ग्रामीण विभागांतून  प्रत्येकी चार स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयीन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केलेल्या प्रत्यक्ष मतदानाद्वारे शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. यातून शहर जिल्हाध्यक्षपदी दयानंद कला महाविद्यालयाचा अमर साखरे, तर उपाध्यक्षपदी एसएसटीएस फॅशन डिझायनिंग कॉलेजची विशाखा पाटील हे निवडून आले. 
ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी चापोलीच्या (ता. चाकूर) संजीवनी महाविद्यालयाची प्रेमल मुसळे, तर उपाध्यक्षपदी अहमदपूच्या महात्मा गांधी महाविद्यालयाचा संभाजी कदम हे निवडून आले. जिल्हाभरातील महाविद्यालयांतून अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या 47 महाविद्यालयांतील 43 विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत भाग घेतला. रेणापूरच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जयद्रथ जाधव, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजयकुमार करजकर, निर्मिती ऍकॅडमीचे डॉ. सचिन जाधव, द व्हर्टेक्‍स ऍकॅडमीचे बलदेव माचवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

निवडणूक निकाल घोषित होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. प्रा. डॉ. राजशेखर सोलापुरे, सचिन उपाध्याय, प्रा. योगेश शर्मा, डॉ. सचिन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्षांसह स्पर्धक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चापोलीच्या संजीवनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चाटे, प्रा. श्रीहरी वेदपाठक, सांडोळचे सरपंच ब्रह्मानंद मुंडे यांनी "सकाळ'च्या कार्यालयात येऊन विजेत्यांचा सत्कार केला. या प्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: latur yin president

टॅग्स