यशवंत पंचायत अभियानात लातूर जिल्हा परिषद प्रथम

विकास गाढवे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

लातूर : दर्जेदार कामकाजाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या यशवंत पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अभियानात सलग तीनवेळा राज्यात प्रथम व एकवेळा द्वितीय आलेल्या जिल्हा परिषदेला यंदापासून सुरू केलेल्या विभागातील प्रथम पुरस्कार जाहिर झाला आहे. येत्या 26 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा गौरव होणार आहे.

चांगली कामगिरी करणाऱ्या पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पारितोषिक देऊन गौरवण्यासोबत त्यांच्या दर्जेदार कामांसाठी स्पर्धा सुरू करण्याच्या हेतूने सरकारने हे अभियान सुरू केले आहे. यात विभाग व राज्यस्तरावर पारितोषिक देण्यात येतात. 2016 - 2017 या आर्थिक वर्षातील कामगिरींची मुल्यमापन करून सरकारच्या ग्रामविकास विभागाने दहा ऑक्टोबर रोजी राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिकासाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांची नावे घोषित केली होती. यासोबत विभागस्तरावरील पंचायत समित्यांची पारितोषिकेही जाहिर करण्यात आली होती. मात्र, यंदापासून विभागस्तरावर प्रथम आलेल्या जिल्हा परिषदांची नावे घोषित केली नव्हती.

मंगळवारी (ता. 16) रात्री नावे घोषित करून औरंगाबाद विभागाचा प्रथम पुरस्कार लातूर जिल्हा परिषदेला जाहिर केला आहे. यापूर्वी जळकोट पंचायत समितीला विभागस्तरीय तृतीय पुरस्कार जाहिर झाला होता. आता जिल्हा परिषदेच्या पुरस्कारामुळे अभियानात लातूरचे दबदबा निर्माण झाला आहे. अभियानाच्या पुरस्कार वितरणात गुणवंत कर्मचाऱ्यांनाही गौरवण्यात येणार आहे. यात लातूर जिल्ह्यातून सहायक प्रशासन अधिकारी चंद्रकांत कदम व कनिष्ठ अभियंता एजाज रियाजसाहब मौजन यांचा गौरव होणार आहे.

असे आहेत अभियानाचे निकष

अभियानात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या कामकाजाचे शंभर गुणांत मुल्यमापन होते. यात सर्वाधिक गुण सभांच्या कामकाजाला असून सभांमध्ये सर्व विषयाचा आढावा घेतला जातो का, हे तपासले जाते.

यासोबत कर्मचारी प्रशिक्षण, तक्रार निवारण कक्ष, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत, स्वच्छता व शुद्ध पाणी, अभ्यागत कक्ष, कर्मचाऱ्यांचा गणवेश, ओळखपत्र, जुन्या रेकॉर्डचे निर्लेखन, संकेतस्थळ, प्रकाशने, आयएसओ मानांकन व कौशल्यवर्धी आदी बाबींनाही गुण आहेत.

जिल्हा परिषदेला मिळालेले पुरस्कार

- सन 2006 - 2007 - राज्यात प्रथम
- सन 2012 - 2013 - राज्यात प्रथम
- सन 2014 - 2015 - राज्यात द्वितीय
- सन 2015 - 2016 - राज्यात प्रथम

Web Title: Latur ZP first in Yashwant Panchayat campaign