लातूरकरांनो, स्वस्थ रहा, शांत रहा, दिलीपराव देशमुख यांनी साधला ‘फेसबुक’वरून संवाद

Diliprao Deshmukha, Latur
Diliprao Deshmukha, Latur

लातूर : मी लातूरकरांचे अभिनंदन करतो, कारण सरकारने घालून दिलेल्या सर्व अटींचे, बंधनांचे लातूरात पालन होत आहेत. यापुढेही लातूरकरांनी घरात बसून सरकारला सहकार्य करायचे आहे. घरात राहून उत्तमोत्तम पुस्तके वाचा, संगीत ऐका, छंद जोपासा, योगासने-ध्यानधारणा करा, असा सल्ला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी लातूरकरांना शुक्रवारी (ता.२७) दिला. संचारबंदीच्या काळात कोणाला गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर त्यांनी तातडीने मला दूरध्वनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


‘कोरोना’चा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली आहेत. पण, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वस्तूंच्या दुकानांसमोरील गर्दी कायम आहे. या पार्श्वभूमीवर, देशमुख यांनी ‘फेसबुक’च्या माध्यमातून लातूरकरांशी संवाद साधला. त्यांचा व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घाबरू नका. काळजी घ्या. स्वस्थ रहा, शांत रहा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.


देशमुख म्हणाले, संबंध राज्यात, देशात आणि जगभरातच कोरोना या विषाणूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आपण सर्वजन काळजी घेत आहोत. कोरोना हा संपर्कामुळे वाढतो. त्यामुळे सामाजिक अंतर, विलगीकरण आवश्यक आहे. त्याचा आग्रह सर्व स्तरातून होत आहे. त्यामुळे त्याचे पालन काटेकोरपणे झाले पाहिजे. यासंदर्भात सरकारने जे आदेश दिलेले आहेत, त्याचे पालन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. घरात बसून विश्रांती घ्यावी. मिळालेल्या वेळेचा सदूपयोग करा. घरातील छोटी-मोठी कामे करता येतील. योगासने, ध्यान-धारणा करा. गरिबांसाठी, मजूरांसाठी तांदुळ, गहू, डाळ मोफत दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मी कौतूकच करतो. राज्य सरकारही योग्य ती पावले टाकत आहे.
सध्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com