लातूरकरांनी विसर्जन नव्हे, केले मु्र्तीचे दान

हरी तुगावकर
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगळा पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरकरांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाचाही वेगळा पॅटर्न निर्माण केलाच; पण राज्यात इतिहासही घडवला आहे. दुष्काळामुळे विसर्जनाच्या ठिकाणी पाणीच नसल्याने गणेशमूर्ती दानाचा संकल्प करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुका जल्लोषात काढण्यात आल्या; पण गणरायाचे पाण्यात विसर्जन न करता 28 हजार 775 गणेशमूर्ती दान करण्यात आल्या.

लातूर ः वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण करणाऱया लातूरकरांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर गणेश विसर्जनाचाही वेगळा पॅटर्न निर्माण केलाच पण राज्यात इतिहासही घडवला आहे. दुष्काळामुळे विसर्जनाच्या ठिकाणी पाणीच नसल्याने गणेश मुर्ती दानाचा संकल्प करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुका जल्लोषात काढण्यात आल्या पण गणरायाचे पाण्यात विसर्जन न करता २८ हजार ७७५ गणेश मुर्ती दान करण्यात आल्या. एकही तक्रार न होता हा जल्लोष रात्रभर कायम राहिला.

 या वर्षी दुष्काळाच्या झळा गणेशोत्सवालाही बसल्या. लातूर शहरात दरवर्षी महापालिकेच्या वतीने सिद्धेश्वर मंदिराचा बारव, बांधकाम विभागाची विहिर, कव्हा येथील तलाव, शासकीय कॉलनीतील विहिर तसेच आर्वी येथील तिवारी यांची विहिरीत गणेश विसर्जनाची सोय केली जाते. पण या वर्षी मोठ्या पावसाने पाठ फिरवल्याने ही पाचही ठिकाणी पाऊस नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सुरवातीपासूनच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, उपअधिक्षक सचिन सांगळे, महापालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांच्या पुढाकारातून सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱय़ांच्या वारंवार बैठका घेणयात आल्या. प्रबोधन करीत या वर्षी गणरायाचे विसर्जन न करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच नागरीकांनी घरातील गणपतीचे घरातच बकेटमध्ये किंवा टब तयार करून त्यातच विसर्जन करावे असे वारंवार आवाहनही करण्यात आले.

गणेश विसर्जनात प्रत्येकाची भावना गुंतलेली असते. पण लातूरकरांना या भावनेला फाटा दिला. दुष्काळाची जाणिव लक्षात घेवून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यातून लातूरकरांच्या सहयोगामुळे मुर्ती दानाचा संकल्प यशस्वी झाला. तब्बल २८ हजार ७७५ मुर्तीचे दान करून लातूरकरांनी राज्यात इतिहास घडविला. विना तक्रार मुर्ती विसर्जन न करणारे लातूरहे राज्यातील पहिलेच शहर ठरले आहे.

मुर्ती दान करीत असताना काढण्यात आलेल्या मिरवणुकातही मोठा जल्लोष राहिला. सळसळत्या तरुणाईला उधान आले होते. दुपारी बारा वाजता सुरु झालेल्या मिरवणुका रात्री दीडपर्यंत चालल्या. पाचही ठिकाणी महापालिकेच्या वतीने मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. मुर्ती संकलन करण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्चमारी, पोलिस तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते हिरिरीने सहभागी झाले होते. इतिहास घडवण्याच आणि संकल्प पुर्तीचा आनंद वेगळाच होता. यातून पाण्याचे प्रदूषणीही टाळण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laturkar donated ganesh idols